Jalgaon News : एकाच कुटुंबातील 3 बालकांचा मृत्यू! चोपडा तालुक्यात शेतशिवारातील घटनेने खळबळ

Jalgaon : कमळगाव येथील पिंप्री शेतशिवारात एकाच कुटुंबातील तीन बालकांचा अज्ञात कारणाने आकस्मिक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
Patients admitted to Primary Health Centre. While inspecting the patients in the primary health center, Taluka Health Officer Dr. Pradeep Lasurkar, Adavad Sarpanch Baban Tadvi etc.
Patients admitted to Primary Health Centre. While inspecting the patients in the primary health center, Taluka Health Officer Dr. Pradeep Lasurkar, Adavad Sarpanch Baban Tadvi etc.esakal
Updated on

Jalgaon News : कमळगाव येथील पिंप्री शेतशिवारात एकाच कुटुंबातील तीन बालकांचा अज्ञात कारणाने आकस्मिक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याच कुटुंबातील आणखी एका बालिकेची प्रकृती अत्यवस्थ आहे. तिला तातडीने जळगावच्या जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही सात जणांवर अडावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. (death of 3 children of same family in Chopda taluka caused stir due to incident in farm )

कमळगाव (ता. चोपडा) येथील पिंप्री शेतशिवारात नीलेश गोविंदा केंगे यांच्या शेतात सीताराम बारेला कुटुंबासह वास्तव्याला आहेत. गेल्या गुरुवारी (ता. १८) रात्री सीताराम बारेला यांची मुले अंजली व रोहित बारेला यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्या वेळी त्यांच्यावर परस्पर अंत्यसंस्कार (दफनविधी) करण्यात आला. त्यानंतर त्यांचा मुलगा बादलही अत्यवस्थ झाल्याने त्याला रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात बादलचे शवविच्छेदन करण्यात आले, तर सीताराम बारेला यांची अवघ्या पाच महिन्यांची कन्या आरती हिचीही प्रकृती चिंताजनक झाली. अखेर तिला शनिवारी (ता. २०) जळगावच्या जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. चौघा बालकांचे वय चार ते आठ वर्षांचे आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याचे कारण अजूनही समजून आलेले नाही. (latest marathi news)

Patients admitted to Primary Health Centre. While inspecting the patients in the primary health center, Taluka Health Officer Dr. Pradeep Lasurkar, Adavad Sarpanch Baban Tadvi etc.
Jalgaon News : असोद्यात रस्ताच खचला! रस्त्याखाली पोकळ जागा

अडावदला सात जण दाखल

उलट्या, मळमळ, जुलाब, पोटदुखीने त्रस्त मुकेश गणेश बारेला (वय आठ), सोनाली गणेश बारेला (दहा), शीला गणेश बारेला (३०), दीपाली गणेश बारेला (दहा), सुनीता गणेश बारेला (१७, सर्व रा. कमळगाव, ता. चोपडा), रेखा मुकेश बारेला (३५), मुकेश लक्षण बारेला (४८, दोन्ही रा. उनपदेव, ता. चोपडा) यांना अडावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पाटील, डॉ. कोमल गावंडे, कविता पाडवी, बबिता वळवी, छोटी बावस्कर, निवेदिता शुक्ल, शोभा चौधरी यांच्याकडून उपचार केले जात आहेत. बादल सीताराम बारेला याचे शुक्रवारी (ता. १९) शवविच्छेदन करण्यात आले.

अहवालानंतर कारण स्पष्ट होणार

शवविच्छेदनाचा अहवाल जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत मृत्यू कशामुळे झाले, हे स्पष्ट होणार नाही. मात्र, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल गावंडे यांनी बालकांच्या मृत्यूचे नेमके कारण सांगता येणार नाही. मात्र, उपचारासाठी दाखल झालेल्यांची योग्य ती काळजी घेतली जात असल्याचे सांगितले.

घराची अधिकाऱ्यांकडून पाहणी!

चोपडा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल गावंडे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी महाजन, विजय देशमुख, वाय. आर. पाटील, आर. एस. पाटील, संतोष भांडवलकर यांच्या पथकाने रविवारी (ता. २०) सायंकाळी बाधित कुटुंबीयांच्या घरी भेटी दिली. त्यात त्यांनी पिण्याच्या पाण्याचे व अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेतले. दुसरीकडे अडावदचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण, नासीर तडवी, भूषण पाटील, अतुल पाटील यांचे पथक बाधित कुटुंबातील सदस्यांच्या जबाबासह या प्रकारणात काही दडलंय काय? याचा शोध घेत आहे.

Patients admitted to Primary Health Centre. While inspecting the patients in the primary health center, Taluka Health Officer Dr. Pradeep Lasurkar, Adavad Sarpanch Baban Tadvi etc.
Jalgaon News : मोकाट जनावरांची शेतशिवारात नासधूस; शेतकरी हैराण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.