Jalgaon News : शाळेच्या पटांगणात खेळताना नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू!

Jalgaon News : कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीचा विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन (वय १५) शाळेत खेळताना पडला व त्यातच त्याचा मृत्यू झाला.
Ghanshyam Mahajan
Ghanshyam Mahajanesakal
Updated on

Jalgaon News : येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीचा विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन (वय १५) शाळेत खेळताना पडला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. १२) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. घनश्‍याम शेवटच्या तासाला शाळेच्या पटांगणात खेळत असताना, चक्कर येऊन पडला. (death of ninth grade student while playing in school playground)

शिक्षकांनी त्याला सावरले व स्थानिक डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथमोपचार केले.नंतर त्याला अमळनेर येथील डॉ. निखिल बहुगुणे यांच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांनी तपासून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

घनश्याम आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडील शेतकरी असल्याने तो शाळेबरोबरच त्यांना शेतीकामातही मदत करायचा. अत्यंत नम्र व हुशार असलेला गुणी विद्यार्थी क्रीडा, नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग घेणारा व शिक्षकांचा अत्यंत आवडता होता. (latest marathi news)

Ghanshyam Mahajan
Jalgaon News : वीजजोडणी राहिलेल्या पाणीयोजना सुरू करा; मंत्रालयात झालेल्या जलजीवन आढावा बैठकीत मंत्री पाटील यांचे निर्देश

घनश्यामच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्याच्या पश्चात आईवडिल, आजी, आजोबा, काका व दोन बहिणी असा परिवार आहे. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले. याबाबत मारवड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

Ghanshyam Mahajan
Jalgaon News : राज्यातील सर्वच कारागृह हाउसफुल : डॉ. सुपेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.