अमळनेर : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या उत्पन्नावर परिणाम करणाऱ्या शासनाच्या अधिसूचनेला चारच दिवसांत राज्यमंत्रिमंडळाकडून स्थगिती मिळाली आहे. अमळनेर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून स्थागितीच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
बाजार समितीकडून शेतमाल खरेदी विक्रीच्या व्यवहारातील सेसमध्ये निम्मी कपात करण्याची अधिसूचना राज्य सरकारने दहा ऑक्टोबरलाच काढली मात्र, त्याला बाजार समिती संघाकडून विरोध झाल्याने चार दिवसांतच म्हणजे १४ ऑक्टोबरला मंत्रिमंडळाने या निर्णयाला स्थगिती दिली. (Jalgaon decision regarding cess welcome)