Jalgaon News : योगशास्त्र विभागातर्फे पदवी, पदविका अभ्यासक्रम! NMUत प्रवेश प्रक्रिया सुरू

North Maharashtra University : मागील वर्षापासून यशस्वी सुरू असलेल्या एम.ए. योगशास्त्र या अभ्यासक्रमासह ‘सर्टिफिकेट कोर्स इन मसाज थेरेपी’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम व ‘डिप्लोमा इन योग टीचर’ हा पदविका अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आला आहे.
kaviyitri Bahinabai Chowdhury Entrance of North Maharashtra University
kaviyitri Bahinabai Chowdhury Entrance of North Maharashtra Universityesakal
Updated on

Jalgaon News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागाद्वारे प्रमाणपत्र, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली आहे. (Degree Diploma Courses by Yogashastra Department NMU)

मागील वर्षापासून यशस्वी सुरू असलेल्या एम.ए. योगशास्त्र या अभ्यासक्रमासह ‘सर्टिफिकेट कोर्स इन मसाज थेरेपी’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम व ‘डिप्लोमा इन योग टीचर’ हा पदविका अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आला आहे.

डिप्लोमा इन योग टीचर हा इयत्ता बारावीनंतरचा एकवर्षीय अभ्यासक्रम असून, प्रवेश घेण्यासाठी इयत्ता बारावी किमान ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच सर्टिफिकेट कोर्स इन मसाज थेरेपी हा दहावीनंतरचा तीन महिने मुदतीचा अभ्यासक्रम आहे. (latest marathi news)

kaviyitri Bahinabai Chowdhury Entrance of North Maharashtra University
Jalgaon News: वसतिगृहाची 30 टक्के शुल्कवाढ 15 टक्क्यांवर! NMU व्यवस्थापन परिषदेचा निर्णय; बृहत आराखडा शिफारसींनाही मान्यता

यासोबतच पदवी (कोणत्याही शाखेचा पदवीधर) ही किमान पात्रता असलेला एम.ए. योगशास्त्र हा दोनवर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू आहे. हे सर्व अभ्यासक्रम शनिवारी, रविवारी होणार आहेत. त्यामुळे नोकर, व्यवसाय, उद्योग सांभाळून हे अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहेत.

या सर्व अभ्यासक्रमांची संरचना आणि अंमलबजावणी प्रक्रिया नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार राहणार आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

kaviyitri Bahinabai Chowdhury Entrance of North Maharashtra University
Bahinabai Chaudhary Award: बहिणाबाई चौधरी पुरस्कारासाठी 9 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव मागविले! NMU तर्फे संस्था, व्यक्तीचा होणार गौरव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.