Jalgaon Banana Demand : केळीच्या भावात तेजी, मागणीही टिकून; खानदेशातील केळीला उत्तर भारतात मागणी

Banana Demand : आठवड्यापासून केळी बाजारात थोडी का असेना पण भावात तेजी सुरू असून खानदेशात केळी कटाई सुरू आहे.
The work in progress of separating bunches of bananas and loading them into cars
The work in progress of separating bunches of bananas and loading them into carsesakal
Updated on

गणपूर, (ता चोपडा) : गेल्या आठवड्यापासून केळी बाजारात थोडी का असेना पण भावात तेजी सुरू असून खानदेशात केळी कटाई सुरू आहे. मागणी टिकून असून उत्तर भारतात केळी जात असल्याचे सध्या चित्र आहे. सध्या बऱ्हाणपूर भागात केळीचे भाव जास्त असून त्या ठिकाणी नवती च्या कमी दर्जा आणि उच्च दर्जा पाहून केळीचे भाव ठरतात. तर चोपडा आणि जळगाव येथे कांदे बागेची केळी सध्या निघत असून तिची कटाई सुरू आहे. मात्र एकंदरीत पाहता भावातील थोडीफार चढउतार सोडता केळीचे भाव गेले अनेक दिवस टिकून असल्याचे दिसून आले आहे. (Demand for Bananas from Khandesh in North India continues )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.