Jalgaon News : रेल्वे बोगींचे डिजिटल बोर्डस् कार्यान्वित करण्याची मागणी; रावेर स्थानकावर बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय

Jalgaon News : त्यामुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. म्हणून तातडीने हे डिजिटल बोर्डस सुरू करण्यात यावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.
A digital board that remains closed even after the arrival of a passenger train at a railway station.
A digital board that remains closed even after the arrival of a passenger train at a railway station.esakal
Updated on

रावेर : येथील रेल्वेस्थानकावर सहा महिन्यांपूर्वी बसविण्यात आलेले रेल्वे गाड्यांच्या बोगींचे डिजिटल बोर्डस (इलेक्ट्रॉनिक फलक) अजूनही कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. म्हणून तातडीने हे डिजिटल बोर्डस सुरू करण्यात यावे, अशी प्रवाशांची मागणी आहे. (Demand for implementation of digital boards of railway coaches)

येथील रेल्वे स्थानकावर नूतनीकरणाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून फलाटांची लांबी वाढवणे, फलाटावर शेड उभे करणे, स्वच्छतागृहे बांधणे अशी कामे सुरू आहेत. याअंतर्गत रेल्वेस्थानकावर विविध गाड्यांच्या येण्या-जाण्याची माहिती दर्शविणारे डिजिटल बोर्डस बसविण्यात आले आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून बसविण्यात येऊनही ते अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. येणाऱ्या प्रवासी गाडीची कोणती बोगी कुठे उभी राहील, हे यामुळे प्रवाशांना कळत नाही. त्यामुळे गाडी आल्यावर प्रवाशांचा गोंधळ उडतो. या स्थानकावर गाडी जास्तीत जास्त दोन मिनिटे थांबते. एव्हढ्या वेळेत महिला, वृद्ध, लहान मुले यांना अपेक्षित बोगीपर्यंत पोचणे कठीण होते. (latest marathi news)

A digital board that remains closed even after the arrival of a passenger train at a railway station.
Nashik Civil Hospital : सिव्हिलच्या आवारातच पावसाच्या पाण्याचे तळे; आरोग्याच्या मंदिरातच वाताहत

प्रवाशांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेले हे इंडिकेटर्स लवकर सुरू केल्यास प्रवाशांची ही अडचण दूर होणार आहे. प्रवासी गाडी येण्यापूर्वी दहा मिनिटे आधीच बोगीचा क्रमांक व जागा या बोर्डवर कळते, म्हणून रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून आधी डिजिटल बोर्डस सुरू करावेत, बाकीची विकासकामे होत राहतील, अशी प्रवाशांची मागणी आहे.

A digital board that remains closed even after the arrival of a passenger train at a railway station.
Jalgaon Rain: पावासाने भुसावळ शहराची वाताहात! अनेकांच्या घरांत पाणी; रस्त्यावर ठिकठिकाणी डबके, बसस्थानकाला तलावाचे स्वरूप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.