Jalgaon Dengue Update : ‘डेंगी’चा ‘डंख’! जिल्ह्यात नऊ महिन्यांत 82 रुग्ण; सप्टेंबरमध्ये उच्चांकी 53 रुग्णांची नोंद

Latest Dengue Update News : डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढत असताना तपासण्यांचे प्रमाण कमी आहे. अनेक रुग्णांमध्ये डेंगीची लक्षणे दिसत असली तरी ते तपासणी करीत नाहीत, त्यामुळे प्रत्यक्ष डेंगीबाधित रुग्णांची संख्या समोर येत नाही.
The Municipal Corporation is conducting survey, inspection and preventive measures in various areas to prevent the spread of dengue. Employees pouring abate into cooler tank
The Municipal Corporation is conducting survey, inspection and preventive measures in various areas to prevent the spread of dengue. Employees pouring abate into cooler tankesakal
Updated on

- महापालिकेकडून उपाययोजना

- जिल्ह्यातही विशेष मोहीम सुरू

- ऑक्टोबरमध्ये पहिल्याच आठवड्यात १७ रुग्ण

जळगाव जिल्ह्यात ‘डेंगी’च्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात १७ रूग्णांची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात ५३ जणांना डेंगीने डंख दिल्याची नोंद आहे. मात्र, त्यात खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची आकडेवारी लक्षात घेता ही संख्या शंभरावर आहे.

सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात २५ तर शहरी नगरपालिका क्षेत्रात २८ रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात भुसावळमध्ये डेंगीच्या संख्येत पावसाळ्यानंतर भर पडली आहे. डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढत असताना तपासण्यांचे प्रमाण कमी आहे. अनेक रुग्णांमध्ये डेंगीची लक्षणे दिसत असली तरी ते तपासणी करीत नाहीत, त्यामुळे प्रत्यक्ष डेंगीबाधित रुग्णांची संख्या समोर येत नाही. (Dengue 82 patients in district in nine months)

जिल्ह्याचा आरोग्य विभाग, महापालिका वैद्यकीय विभागासह आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालयामार्फत डेंगीवरील नियंत्रणासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, त्या पुरेशा नाहीत. नागरिकांमध्ये दरवर्षी पावसाळ्यातच डेंगीच्या साथीबद्दल प्रचार, प्रसाराद्वारे जनजागृती केली जाते.

मात्र, ती मर्यादित स्वरुपाची असल्याने डेंगी नियंत्रणात अपयश येत असल्याचे चित्र आहे. ऑक्टोबर महिन्यात ग्रामीण भागात ८ तर जळगाव शहरात ९ रूग्णांची नोंद झाली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

हॉटस्पॉट भागात सर्वेक्षण आरोग्य विभागातर्फे ‘डेंगी’च्या हॉटस्पॉट असलेल्या परिसरात सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात या डासांची उत्पत्ती स्थळे शोधून ती नष्ट केली जात आहे. तसेच मुक्ताईनगर तालुक्यातही डेंगीच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने धूर फवारणी, रक्त तपासणी व सर्वेक्षण व अँबेटींगचा अभाव असल्याचे दिसून येते या उपाययोजनांकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. खासगी दवाखान्यात रुग्ण उपचार घेत आहेत.

"डेंगीचा वाढता प्रसाराला आळा घालण्यासाठी नागरीकांना कोरडा दिवस पाळावा. पाण्याचे साठे झाकून ठेवावे. परिसर स्वच्छ ठेवावा. ताप येताच तातडीने रक्ताची तापसणी करून घ्यावी."

- डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

एकाच महिन्यात २३६ ‘डेंगी’चे संशियत

एकाच महिन्यात डेंगीचे २३६ संशयित आढळले असून, त्यात सर्वाधिक ६४ रुग्ण भुसावळ तालुक्यातील आहे. भुसावळ तालुका हा सध्यास्थितीत डेंगी रुग्णांचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्यानंतर मुक्ताईनगर, बोदवड, यावल या तालुक्यातही डेंगीने हातपाय पसरवायला सुरवात केली आहे.

नऊ महिन्यांत ८२ बाधित

जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेबर २०२४ या नऊ महिन्यात संशयित रूग्णांचे नमुने घेण्यात आले होते. त्यात ५९४ रूग्ण संशयित असून ८२ रूग्णांना या काळात डेंगीची लागण झाली आहे. शासकीय आकडा १०० पेक्षा कमी असला तरी या नऊ महिन्यातील खासगी रूग्णालयातील नोंद नाही.

‘डेंगी’ विषाणूजन्य आजार

डेंगी हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. प्रामुख्याने या डासांची एडिस इजिप्ती ही प्रजाती डेंगी पसरविण्यास कारणीभूत असते. डेंगीला हाडे मोडून काढणारा ताप म्हणतात. या तापामुळे काही जणांना हाडे आणि स्नायूत खूप दुखते. डेंगीचे निदान NS1,IgM आणि IgG या रक्ताच्या तीन चाचण्या करून होते.

महापालिकेची मोहीम

जळगाव महापालिकेने शहरातील विविध भाग करून त्या ठिकाणी डेंगीचा प्रसार रोखण्यासाठी म्हणून मोहीम सुरू केली आहे. शहरात महापालिकेची विविध १० पथके तयार करण्यात आली असून, त्या प्रत्येक पथकावर एक पर्यवेक्षक नेमण्यात आला आहे. शहरातील चारही प्रभाग समिती कार्यालयांच्या क्षेत्रात ही पथके दैनंदिन तपासणी करीत आहेत. त्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण, डेंगीची लक्षणे कुटुंबातील सदस्यांमध्ये आढळून येत आहेत का, किती सदस्य तापाने अथवा अन्य आजारांनी बाधित आहेत याची नोंद घेतली जात आहे.

तर स्वच्छता व उपााययोजनांच्या दृष्टीने घरोघरी जाऊन पाणी साठविण्याची भांडी, टाक्या, वस्तूंची तपासणी केली जात आहे. डेंगी पसरविणाऱ्या डासाची अंडी आढळून आल्यास त्या पाण्यात ॲबेट सोल्यूशन टाकले जात असून, उघड्या डबक्यांवर फवारणी सुरू आहे. काही भागात धूरफवारणीही सुरू असून, त्याचा चांगला परिणाम होत असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. (latest marathi news)

The Municipal Corporation is conducting survey, inspection and preventive measures in various areas to prevent the spread of dengue. Employees pouring abate into cooler tank
Dhule Dengue Update : जिल्हा रुग्णालयासह खासगी दवाखान्यात एकाच दिवसात 22 डेंगी संशयित रुग्ण! मनपातर्फे नियमित उपाययोजना

ही आहेत ‘डेंगी’ची लक्षणे

डेंगीच्या तापाचे दोन प्रकार आहेत. त्यात डेंगी फिव्हर डीएफ, आणि डेंगी हेमोरहजीक फिवर डीएचएफ.

- पहिल्या प्रकारात रुग्णाला अचानक थंडी वाजून ताप येतो

- याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडे, सांध्यांमध्ये वेदना होणे

- मळमळ, अंगावर सूज आणि चट्टे येणे अशी लक्षणे दिसून येतात.

- डास चावल्याल्यानंतर चार ते दहा दिवसांत लक्षणे दिसू लागतात

- दुसऱ्या प्रकारच्या तापासोबतच रक्तस्राव होऊन जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.

- सुरुवातीला ताप आणि अंगदुखी होते

- शरीरावर पुरळ, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव

- मळमळ, उलटी, लघवीतून रक्त बाहेर पडणे

- सतत तहान लागणे आणि अशक्तपणा

- अशा गंभीर स्थितीत रुग्णाच्या मेंदू, फुप्फुसं किंवा किडनीवरही परिणाम शक्य

डेंगीवर उपचार

डेंगीवर ठराविक असे उपचार किंवा औषध उपलब्ध नाही. पण लवकर निदान झाल्यास आणि वेळीच उपचार मिळाल्यास यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. रुग्णाला त्याच्या लक्षणांनुसार म्हणजे ताप किंवा अंगदुखी पाहून तशी औषधे दिली जातात. जर प्रकृती गंभीर असेल तर रुग्णालयात भरती करावे लागते.

डेंगी तापामुळे शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होते. साधारणपणे एक घन मिलीलीटर रक्तात दीड लाख ते साडेचार लाख प्लेटलेट्स असणे गरजेचे असते. जर प्लेटलेट्सचे प्रमाण १० हजारांच्या खाली गेल्या तर रुग्णाला बाहेरून प्लेटलेट्स द्यावे लागतात. साधारणपणे डेंगीचा रुग्ण योग्य उपचार घेतल्यास आठ दिवसांत बरा होतो.

...अशी घ्याल काळजी

डेंगी पसरविणाऱ्या अळ्या किंवा एडिस इजिप्ती प्रजातीचे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात.

- डेंगीचे डास स्वच्छ पाण्यात तयार होतात.

- यामुळे स्वच्छ पाणी साचू देऊ नका

- एक दिवस घरात ‘ड्राय डे’ पाळा

- टाक्या, पिंप, हंड, कुलरमधील पाणी रोज फेका

- कूलर, कुंड्या, जुन्या टायरमध्ये पाणी जमा होऊ देऊ नका.

- घरात एसी, फ्रीजखाली साचलेल पाणी त्वरित फेका

- घर व परिसर स्वच्छ ठेवा.

- डेंगीचे डास दिवसाच चावतात

- घरांच्या खिडक्यांना जाळी लावा

- दारे-खिडक्या सकाळी, सायंकाळी बंद ठेवा

‘जीएमसी’त २७ रुग्ण

जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) सप्टेंबर महिन्यात ४२८ जणांच्या डेंगीच्या तपासण्या झाल्या. त्यातील २७ रुग्ण डेंगी पाॅझिटिव्ह आढळले होते. दररोज शंभरावर रूग्ण तापाचे येतात. ताप जास्त दिवस असल्यास, लक्षण अधिक असल्यास अशा रुग्णांना लक्षणे पाहून डेंगीची टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. पाॅझिटिव्ह आल्यास दाखल करून उपचार केले जातात. ‘जीएमसी’त डेंगीची टेस्ट करण्यासाठी शासकीय फी १५० रूपये आहे. (latest marathi news)

The Municipal Corporation is conducting survey, inspection and preventive measures in various areas to prevent the spread of dengue. Employees pouring abate into cooler tank
Nashik Dengue Update : डेंग्यूचा विळखा होतोय घट्ट! सिन्नरला तेरा रूग्ण; साथीच्या रुग्णांनी दवाखाने फुल्ल, चिकणगुणियाचीही लागण

जानेवारी ते ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात आढळलेले रूग्ण

(तालुकानिहाय डेंगीचे रुग्ण असे)

तालुका-- संशयित रुग्ण-- बाधित रुग्ण

अमळनेर--१७--१

पारोळा--४-१

भडगाव--५--०

चाळीसगाव--१५-०

पाचोरा--१३--२

एरंडोल--१८--३

धरणगाव--२०--२

चोपडा--५९-५

रावेर--१३--२

यावल--२३--४

मुक्ताईनगर--२३--१

जामनेर--१६--४

भुसावळ--१०१--१४

जळगाव--४७--३

बोदवड--६--१

इतर जिल्हातील-१६--०

ग्रामीण एकूण--३९६--४३

महापालिका-१९८--३९

एकूण--५९४--८२

पपई गुणकारी पण.. ड्रॅगन फ्रूट, किवी प्रभावी नाही

डेंगीच्या रुग्णांमध्ये प्लेटलेटस्‌ कमी होण्याचे प्रकार दिसून येतात. बऱ्याचवेळी प्लेटलेटस्‌ची संख्या लक्षणीयरित्या खालावली की, त्या रक्तातून द्याव्या लागतात. प्लेटलेटस्‌ वाढीसाठी बऱ्याचदा ड्रॅगन फ्रूट, किवी फळ खाण्याचा सल्ला काही जणांकडून दिला जातो. अर्थात, डॉक्टर अथवा वैयद्यकीय तज्ज्ञ, आयुर्वेद तज्ज्ञ किवी, ड्रॅगन फ्रूट खाण्याचा सल्ला देत नाहीत.

या फळांचा प्लेटलेटस्‌ वाढीसाठी काही उपयोग होतो का, याबाबत शंका आहे. अथवा त्यासंदर्भात कोणताही शास्त्रीय आधार नाही. परंतु, डेंगीत प्लेटलेटस्‌ कमी झाल्या असतील तर पपई, पपईच्या पानांचा रस घेतल्यास तो फायदेशीर ठरू शकतो. त्याला शास्त्रीय आधारही आहे. डॉक्टरही पपई खाण्याविषयी सल्ला देत असतात.

तपासणीची प्रक्रिया किचकट

डेंगीसाठी रक्ताची तपासणी करावी लागते. खासगी प्रयोगशाळेत नमुने दिल्यानंतर लगेचच तो अहवाल प्राप्त होतो. संबंधित रुग्णाचा खासगी प्रयोगशाळेचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) असला तर महापालिकेला त्याबाबत कळवावे लागते.

महापालिकेचे पथक त्या नमुन्याची पुन्हा तपासणी करते. त्यानंतरच संबंधित रुग्णास बाधित आहे किंवा नाही, याबाबत कळविले जाते. खासगी प्रयोगशाळेत बाधित आलेल्या अहवालांपैकी महापालिकेच्या यंत्रणेतील तपासणीत काही अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा प्रकारही समोर आला आहे.

असे आहे तपासणी शुल्क

- शासकीय यंत्रणेच्या ठिकाणी : १५० रुपये (प्रति तपासणी)

- खासगी प्रयोगशाळेत : ८०० ते १००० रुपये (प्रति तपासणी)

ठमुलांमध्ये डेंगी तसेच डेंगीसदृष आजाराचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांत त्यासंबंधी लक्षणे असलेली अनेक लहान मुले तपासणीसाठी येत आहेत. ताप उतरत नाही, रक्त तपासणीत काही गंभीर तथ्ये समोर आली तर आम्ही त्यांना दाखल करुन घेत आहोत. डेंगीसदृष लक्षणे असलेल्या मुलांचे प्रमाण सध्यातरी रोजच्या तपासणीत २० टक्क्यांपर्यंत वाढले आहे.ठ

- डॉ. राजेश पाटील, बालरोगतज्ज्ञ

"पावसाळी वातावरण व हिवाळा सुरू होण्याचा हा काळ आहे. डास चावल्याने अनेक तापाची लागण होते. यामुळे डास चावूच नये, यासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यावी. अंगभर पूर्ण कपडे घालावेत. एक दिवस कोरडा दिवस पाळावा. तापाच्या लक्षणांवरून ताप डेंगीचा आहे की व्हायरल आहे हे समजते." - डॉ. विजय गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, ‘जीएमसी’

"ज्या भागात डेंगीचे संशयित रुग्ण आढळतात. त्या परिसरात आम्ही लागलीच मलेरियाची फवारणी करतो. धुराचीही फवारणी करतो. मलेरिया व आरोग्य विभागाचे पथक त्या भागात जावून घरातील साठविलेल्या पाण्याची तपासणी करतात. साठविलेले पाणी फेकून एकदिवस कोरडा पाळण्यास सांगतात."

- उदय पाटील, सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग, मनपा, जळगाव

The Municipal Corporation is conducting survey, inspection and preventive measures in various areas to prevent the spread of dengue. Employees pouring abate into cooler tank
Dengue Chikungunya disease : चिकनगुणियावर `देशी’ चा उतारा? ‘सांधेदुखी’वर गावठी उपचाराचे प्रयोग : शास्त्रीय आधार नाहीच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.