Amit Shah Jalgaon Daura : कॉंग्रेस पक्षाने गरीबी हटावच नारा दिला मात्र सत्तर वर्षात गरीबी हटविलीच नाही. परंतु नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच दहा वर्षात धन्नाशेठकडील काळा पैसा काढून गरिबांचा विकास केला असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
जळगाव येथे सागर पार्क मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत युवा संवाद र्कायक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात तब्बल २५ कोटी लोकांना गरिबीच्या रेषेच्यावर आणले आहे.
(Jalgaon Devendra Fadnavis statement Modi took black money from Dhanna Sheth and developed poor)
गरिबांसाठी त्यांनी चांगल्या योजना राबविल्या. घर दिले, प्रत्येक घरात पाणी दिले. धन्नाशेठच्या घरातील काळा पैसा काढून गरिबांचा विकास केला. युवकांना रोजगाराची संधी दिली, आगामी पाच वर्षात मोदी यांना निवडून देवून भारताचा विकास करायचा आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात देशाचा विकास केला आहे. युवकांसाठी कार्य केले आहे.येत्या लोकसभा निवडणुकीतही मोदींना मतदान करून भारताच्या विकासाच्या संकल्पाला साथ द्यावी असे आवाहान केले.
युवक, युवती गाण्यावर थिरकले
‘युवा संवाद’कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात युवक,युवती उपस्थित होते. अमित शहा सभेस येण्यापूर्वी गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गाण्यावर उपस्थित तरूणाई थिरकली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, महानगराध्यक्ष उज्वला बेंडाळे, आदी पदाधिकारी व्यासपीठावर होते.
अमित शहांच्या घोषणांना प्रतिसाद
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युवकांमध्ये जल्लोष निर्माण करण्यासाठी घोषणा दिल्या. जय जय जय जय भवानी ...जय जय जय जय शिवाजी अशा घोषणा दिल्या उपस्थितीत युवकानीही जोरदार जल्लोषात घोषणा दिल्याने वातावरणात रोमांच उभे राहिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.