Dharangaon MSRTC Depot : धरणगाव बसस्थानक अनेक सुविधांपासून वंचित; प्रवाशांची गैरसोय

MSRTC Depot : तालुक्यासाठी धरणगाव शहरात बसस्थानक आहे मात्र, आगार नाही. म्हणून अनेक मूलभूत सुविधा नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
Dharangaon Depot
Dharangaon Depotesakal
Updated on

धरणगाव : तालुक्यासाठी धरणगाव शहरात बसस्थानक आहे मात्र, आगार नाही. म्हणून अनेक मूलभूत सुविधा नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्याने तहान भागविण्यासाठी प्रवशांना भटकंती करावी लागते. सहलींसह लग्नकार्यासाठी बस आरक्षण करण्याची सुविधा नसल्याने एरंडोलला जावे लागते. लांबपल्ल्याच्या प्रवासासाठीही बस नसल्याने जळगाव, एरंडोल किंवा अमळनेरला जावे लागत असल्याने गैरसोय होत आहे. (Dharangaon bus station is disadvantage for passengers deprived of many facilities )

यांसह अनेक मूलभूत सुविधांपासून धरणगाव बसस्थानक वंचित आहे. धरणगावहून केवळ जळगाव-नाशिक व जळगाव-पुणे या दोन लांबपल्ल्यांच्या बस सकाळी आहेत. याव्यतिरिक्त लांबपल्ल्यांची कोणतीही बस नाही. बसस्थानकावरून रोज साधारण १७५ फेऱ्या होतात. त्यातून पाच ते सहा हजार प्रवासी प्रवास करतात. बसस्थानकाची जागा लहान असल्याने एकाचवेळी चार-सहा बस आल्यास उभे राहायला जागा नसते. बसस्थानकाअंतर्गत ग्रामीण भागातून ये-जा करणारे दीडहजार पासधारक विद्यार्थी आहेत.

त्यांनाही अनेकदा मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्या दौऱ्यांसह आषाढी पंढरपूर यात्रा आदी कारणांमुळे बस मिळत नसल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होते. बसस्थानकात दोन वाहतूक नियंत्रक व पासधारकांसाठी एक असे तीन कर्मचारी एरंडोल आगाराअंतर्गत कार्यरत आहेत. धरणगावहून म्हणकाले (कंडारी), कल्याणी खुर्द व कल्याणी होळ, हिंगोणे खुर्द व हिंगोणे बुद्रुक या गावांना डांबरी रस्ता असूनही अजून बस जात नाहीत. म्हणून तेथील विद्यार्थ्यांसह प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. म्हणून या गावांना तातडीने बससेवा सुरू होणे गरजेचे आहे.

Dharangaon Depot
Muktainagar MSRTC Depot : मुक्ताईनगर बसस्थानक समस्यांचा विळख्यात; पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

आवश्‍यक सोयीसुविधांची गरज!

धरणगावला सुसज्ज बसस्थानकाची गरज आहे. लांबपल्ल्यांच्या बस येथून सुटाव्यात, मुंबई, पुणे, नाशिकसाठी रात्री बसची व्यवस्था व्हावी. बसस्थानकावर स्वतंत्रपणे प्रवाशांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था होण्याची गरज आहे. नगरपालिकेने ठेवलेली टाकी एकाच वेळी भरली जाते. मात्र, दिवसभर ये--जा करणाऱ्या प्रवासांसाठी ती पुरेशी नाही. म्हणून प्रवाशांना स्वच्छ फिल्टर पाणी मिळावं, अशी मागणी आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांना भटकावे लागते.

लग्न, शैक्षणिक सहलींसह विविध खासगी प्रवासासाठी बस आरक्षणाची धरणगावला व्यवस्था नसल्याने एरंडोलला जावे लागते, ती व्यवस्थाही झाली पाहिजे. अद्ययावत उपहारगृहाची सुविधा होण्याची गरज आहे. धरणगाव बसस्थानकात स्वच्छतेचा अभाव दिसतो. शिवाय धरणगाव महाविद्यालय, चिंचपुरा, मुसळी आदी ठिकाणी विद्यार्थी उभे असतानाही बस थांबत नाहीत, त्या थांबाव्यात.

''धरणगावातून रात्री लांबपल्ल्यांच्या बस सुटाव्यात, गुजरातमध्ये अंकलेश्वरव्यतिरिक्त एकही बस जात नाही. सुरत, अहमदाबाद, बडोदा आदी ठिकाणीही बसची व्यवस्था झाली, तर प्रवाशांसह व्यापाऱ्यांचीही सोय होईल. जळगाव-धुळे, जळगाव-नाशिक अनेक बस एरंडोल व पारोळामार्गे जातात. त्यापैकी काही बस धरणगाव-अमळनेरमार्गे सुरू केल्यास प्रवाशांची सोय होईल अन्‌ एसटी महामंडळाचे उत्पन्नही वाढेल. धरणगाव बसस्थानकात आरक्षणाची सोय व्हावी, खासगी प्रवासासाठी बस आरक्षणाची सुविधा झाली पाहिजे. रात्री सव्वाआठनंतर जळगावसाठी एकही बस नसल्याने अनेक प्रवाशांना रेल्वेच्या प्रवासासाठी जळगावला जावे लागते. म्हणून रात्री साडेनऊनंतर धरणगावहून जळगावला जाण्यासाठी किमान एक बस असणे आवश्यक आहे.''- महेंद्र कोठारी, अध्यक्ष, तालुका प्रवासी संघटना, धरणगाव.

Dharangaon Depot
Satana MSRTC Depot : जुन्याच बसेसमधून रामभरोसे प्रवास! नव्या गाड्यांची प्रतिक्षा; परिसरात खड्डे अन्‌ घाणीचे साम्राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.