Jalgaon News : भुसावळला जीर्ण इमारत कोसळली! अर्धा भाग जमीनदोस्त; जीवितहानी टळली, काही दुकानांचे नुकसान

Jalgaon News : काही व्यापाऱ्यांची दुकाने मात्र इमारतीच्या मलब्याखाली दबली गेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला आहे. मात्र पालिका प्रशासन यापासून अभिनज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
Part of a building collapsed due to rain
Part of a building collapsed due to rainesakal
Updated on

भुसावळ : शहरातील राम मंदिर वॉर्डातील बालाजी गल्लीमधील भर रस्त्यावरील इमारतीचा अर्धा भाग पावसाच्या पाण्यामुळे मंगळवारी (ता. ८) मध्यरात्री दोनच्या सुमारास कोसळला. मात्र या घटनेत जीवितहानी टळली. काही व्यापाऱ्यांची दुकाने मात्र इमारतीच्या मलब्याखाली दबली गेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला आहे. मात्र पालिका प्रशासन यापासून अभिनज्ञ असल्याचे दिसून येत आहे. (Jalgaon Dilapidated building collapsed in Bhusawal)

गेल्या अनेक वर्षांपासून बालाजी गल्लीत 'टेमाणी बिल्डिंग' म्हणून ओळख असलेल्या इमारतीचा अर्धा भाग पावसाच्या पाण्यामुळे अचानक रात्री दोनच्या दरम्यान कोसळला. कित्येक वर्षांपासून ही इमारत एक खंडर अवस्थेत पडून होती. या ठिकाणी कुणीही वास्तव्याला नव्हते. मात्र या इमारतीच्या खाली काही व्यापाऱ्यांची दुकाने दैनंदिन सुरू होती.

या परिसरात राष्ट्रीयकृत बँक तसेच आजूबाजूला नागरिकांचे वास्तव्य आहे. तर काही अंतरावर सराफ बाजार असल्याने नागरिकांची नेहमी या मार्गाने वर्दळ असते. तसेच इमारतीच्या समोरील बाजूस शूज व कपड्यांचे मॉल तसेच टेमाणी नामक व्यक्तीची नास्ता (कचोरी - समोसा) हातगाडी सकाळपासून सायंकाळपर्यंत लागत असल्याने खवय्यांची नेमही गर्दी असते.

मात्र सुदैवाने घटना ही मध्यरात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र व्यापाऱ्यांची दुकाने दबली गेल्याने त्यांना उपासमारीची वेळ आली आहे. पालिका प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांचे लक्ष लागून आहे. (latest marathi news)

Part of a building collapsed due to rain
IIT Salary: आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा पगार झाला कमी; ऑफर्समध्येही झाली घट, काय आहे कारण?

शहरात ७५ जीर्ण इमारती

भुसावळ शहरात सुमारे ७५ च्या वर जीर्ण इमारती आहेत. पालिका दरवर्षी जीर्ण इमारत मालक किंवा भाडेकरूंना नोटीस बजावते. मात्र, पुढील कार्यवाही थंड बस्तात राहते. नोटिशीला संबंधित मालमत्ताधारक केराची टोपली दाखवतो. त्यामुळे अशा दुर्घटना घडतात. सुदैवाने या घटनेत कुठलीही मनुष्यहानी झालेली नाही. परंतु पालिकेने लक्ष द्यावे.

महिनाभरातील दुसरी घटना; पालिका अनभिज्ञ

या आधीही २४ जूनला या इमारतीच्या काही अंतरावर पावसाच्या पाण्यामुळे पंजाब नॅशनल बँक समोरील एका इमारतीची भिंत रस्त्याच्या बाजूकडील कोसळली होती. या घटनेला महिनाही झाला नसून याच परिसरातील ही दुसरी घटना घडली आहे. पालिका प्रशासनाने आता तरी जागे व्हावे व जीर्ण इमारतींना पाडण्याची कार्यवाही करावी.

Part of a building collapsed due to rain
Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.