Jalgaon News : फैजपूरच्या दिव्यांग दांपत्याची हंडाभर पाण्यासाठी भटकंती! विठ्ठल मंदिर भागातील समस्येकडे पालिकेचे दुर्लक्ष

Jalgaon News : वर्ष झाले, पालिका प्रशासन या दिव्यांग दांपत्य राहत असलेल्या भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी सपशेल अपयशी ठरले आहे.
A disabled couple carrying water on a tricycle in the Vitthal Mandir area of ​​Shiv Colony.
A disabled couple carrying water on a tricycle in the Vitthal Mandir area of ​​Shiv Colony.esakal
Updated on

फैजपूर (ता. यावल) : गेल्या तीन ते चार वर्षांपासून पालिकेत फेऱ्या मारून इतकेच नव्हे, तर गेल्या वर्षी पाण्यासाठी शंभर टक्के दिव्यांग नागरिकाने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुसऱ्या मजल्यावरील २० पायऱ्या चढून कार्यालय गाठले आणि ‘अहो पाणी मिळेल का पाणी’, अशी आर्त हाक देत मागणी केली.

वर्ष झाले, पालिका प्रशासन या दिव्यांग दांपत्य राहत असलेल्या भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे या दिव्यांग दांपत्याला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. (Jalgaon disabled couple of Faizpur wanders for water)

शहरातील शिवकॉलनीमध्ये विठ्ठल मंदिर मागील भागातील नागरिक त्यांच्या भागातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून सतत पालिकेत चकरा मारत आहेत. महिलांसह नागरिक अनेकवेळा येऊन अनेकवेळा लेखी अर्ज देऊनही या भागातील पाणीप्रश्न मार्गी लागलेला नाही.

मागील वर्षी ऐन पावसाळ्यात जून महिन्यात आश्वासन देऊनही समस्येचे निवारण न झाल्याने या भागातील नागरिकांनी पाणी समस्या सोडविण्यासाठी पालिकेत धडक दिली होती. या वेळी याच भागातील शंभर टक्के दिव्यांग नितीन महाजन यांनी पालिकेच्या चक्क २० पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पाणीपुरवठा विभागात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. (latest marathi news)

A disabled couple carrying water on a tricycle in the Vitthal Mandir area of ​​Shiv Colony.
Shrirampur Water Crisis : श्रीरामपूरचा पाणीप्रश्‍न पेटणार; कानडे, मुरकुटे, ससाणेंसह शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

दरम्यान, नितीन महाजन व त्यांची पत्नी दोन्ही पायांनी ९० टक्के दिव्यांग आहेत. हे दांपत्य दिव्यांग असूनही त्यांना तीनचाकी बाईकवर भुसावळ रोड जुने नाक्याजवळून पाणी आणावे लागत आहे. दोन्ही पायांनी दिव्यांग असताना, त्यांना हाल अपेष्टा सहन करून पाणी आणावे लागत आहे.

शिवकॉलनीमधील विठ्ठल मंदिर भागात गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून पालिकेकडून पाणीपुरवठा जोडण्याचे काम आतापर्यंत झाले. मात्र, वेगवेगळ्या प्रयोगांना नियोजनाअभावी अपयश आले. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी समस्येची झळा सोसावी लागत आहे. आता या भागातील पाणी समस्या कायमची मार्गी न लागल्यास दिव्यांग व कॉलनीवासीयांनी नगरपालिका कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

A disabled couple carrying water on a tricycle in the Vitthal Mandir area of ​​Shiv Colony.
Pune Water Crisis : पुणे जिल्ह्यातील ११ तालुके तहानलेले; चार लाख नागरिक, दोन लाख जनावरांना टँकरद्वारे पुरवठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.