Jalgaon News : केळी रेल्वे वॅगनच्या भाड्यात सवलत पूर्वरत व्हावी; मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीची 125 वी बैठक

Jalgaon News : क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समितीची १२५ वी बैठक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात झाली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव अध्यक्षस्थानी होते.
Member Viraj Kavadia speaking at the Mumbai Regional Railway Advisory Committee meeting.
Member Viraj Kavadia speaking at the Mumbai Regional Railway Advisory Committee meeting.esakal
Updated on

Jalgaon News : अमरावती-पुणे नियमित करावी, केळी रेल्वे वॅगनच्या भाड्यात सवलत पूर्वरत व्हावी आदी मागण्या रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आल्या. क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समितीची १२५ वी बैठक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात झाली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव अध्यक्षस्थानी होते. (125th Meeting of Advisory Committee of Central Railway)

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यांतील मध्य रेल्वे सल्लागार समितीचे ४५ सदस्य उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातून क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य विराज कावडीया यांनी प्रतिनिधित्व केले. बैठकीत श्री. कावडीया यांनी जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने विविध विषयांवर मांडणी केली.

यात जळगाव रेल्वेस्थानकावर वातानुकिलित शयनगृह बांधावे, किसनगढ राजस्थानपर्यंत ट्रेन सुरू करावी, केळी उत्पादकांना रेल्वे वॅगनच्या भाड्यात सवलत पूर्वरत व्हावी, जळगाव रेल्वेस्थानकावरील अतिक्रमण काढावे. (latest marathi news)

Member Viraj Kavadia speaking at the Mumbai Regional Railway Advisory Committee meeting.
Asian Highway : आशियाई महामार्गावरून जाताना चंद्रावरच्या प्रवासाचा येतोय फील; सोशल मीडियावर महामार्गाचे वाभाडे

जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही, मुख्य द्वारनिर्मित व्हावे, जळगाव जिल्ह्यातील रेल्वेस्थानकांवर स्वच्छता व सुशोभीकरण करावे, खानदेशमधील प्रसिद्ध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स प्रत्येक रेल्वेस्थानकावर सुरू करावेत, तसेच मनी ट्रान्सफर स्टॉल, मेडिकल सुरु कराव्यात, जळगाव ते पुण्यासाठी वाढीव रेल्वे, भुसावळ व पुणेदरम्यान असलेल्या रेल्वेला जळगाव येथे थांबा, भुसावळ ते पुण्यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेसमध्ये स्लिपर कोचस वाढविणे, जळगाव रेल्वेस्थानकावर चारचाकींसाठी वाहन तळाची निर्मिती दोघी बाजूने, प्रवाशांना चढण्या व उतरण्यासाठी एस्कलेटर्स अविरत सुरू ठेवणे, रेल्वेत होणाऱ्या वाढत्या चोऱ्यांसदर्भात उपाययोजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी भाड्यात सवलत पूर्वरत करणे, जळगावसारख्या महत्त्वाच्या जीआरपी व आरपीएफ आऊट पोस्टवर एकही महिला कॉन्स्टेबल नाही, रेल्वेस्थानकावरील प्रतिक्षालयाची स्थिती सुधारावी, कुलींचे दर ठरवावेत, वेटिंग तिकीट नियम प्रवाशांच्या हितार्थ करावेत, सणासुदीवेळी जळगावहून पुणे व मुंबई मार्गावर विशेष ट्रेन सुरू कराव्यात, सुरू असलेल्या गाड्यांना डब्बे वाढवावेत आदी मागण्या विराज कावडीया यांनी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांना केल्या.

Member Viraj Kavadia speaking at the Mumbai Regional Railway Advisory Committee meeting.
Explore Karnataka : भारताचं स्कॉटलंड म्हणून ओळखलं जातं हे ठिकाण, मंदिरे, ऐतिहासिक वारसा अन् बरंच काही, कधी जाताय फिरायला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.