Jalgaon News : वरणगावात मतदान करणाऱ्यांसाठी डॉक्टरांसह सलूनचालकांकडून सूट!

Jalgaon News : रावेर लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात रविवारी (ता. १३) मतदान होणार आहे
Doctor & Salon
Doctor & Salonesakal
Updated on

वरणगाव (ता. भुसावळ) : बोटाला शाई दाखवा आणि शहरातील खासगी डॉक्टरांकडून रुग्णांना उपचार, तर केश कर्तनालयात दाढी कटिंगमध्ये सवलत घ्या, असा उपक्रम लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मेडिकल असोसिएशन व नाभिक संघटनेने घेतला आहे. (Jalgaon Discounts from salon operators including doctors)

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात रविवारी (ता. १३) मतदान होणार आहे. मागील निवडणुका बघता मतदानाची टक्केवारी घसरल्याने नगरपालिकेने टक्केवारी वाढविण्यासाठी आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत वरणगाव मेडिकल असोसिएशन, नाभिक संघटना, गणपती हॉस्पिटल व गुरुवर्य प्रतिष्ठान (भुसावळ)ने मतदान करणाऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या आहेत.

वरणगावात लोकसभेच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नगरपालिकेने विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत मतदान करण्याबाबत शहरातील बसस्थानक चौकात पथनाट्य, मताचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी बॅनर लावले. ही टक्केवारी वाढावी, यासाठी रोज विविध युक्त्यांचा वापर मुख्याधिकारी सचिन राऊत, कार्यालय अधीक्षक पंकज सूर्यवंशी व त्यांचे कर्मचारी करीत आहेत. (latest marathi news)

Doctor & Salon
Jalgaon Lok Sabha: अभिनव संकल्पनांनी सजली मतदान केंद्र! मतदारांना आकर्षिक करण्यासाठी ‘केळीचे आगार’, ‘पर्यावरण पर्यटना’चा लूक

या उपक्रमांतर्गत वरणगाव मेडिकल असोसिएशन व नाभिक संघटनेशी चर्चा करण्यात आली. या चर्चेतून मतदान करेल व बोटावरील शाई दाखवेल, त्या व्यक्तीला वैद्यकीय तपासणीत ३० टक्के, तर सलून दुकानात २५ टक्के सूट दिली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन निश्चितपणे मतदानाची टक्केवारी वाढविता येऊ शकते. ही सूट १३ व १४ मे, अशी दोन दिवस राहणार आहे. या उपक्रमाबद्दल दोन्हीही संघटनांचे कौतुक होत आहे.

मतदारांसाठी सेल्फी पॉइंट

लोकसभा मतदानासाठी मी मतदान केले. तुम्हीही मतदान करा व लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हा, अशा आशयाचे मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी सेल्फी पॉइंट गणपती हॉस्पिटल, डॉ. पंकज पाटील व गुरुवर्य प्रतिष्ठानचे बापू चौधरी यांच्यातर्फे उभारण्यात येणार आहे.

Doctor & Salon
Jalgaon News : मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीत 50 टक्के सवलत! डॉ. नि. तु. पाटील यांचा दहा वर्षांपासून उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.