Jalgaon News : आता शाळेतूनच काढा एसटी पास! विशेष मोहिमेंतर्गत वितरण सुरू

Jalgaon : एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ६६ टक्के सवलत दिली आहे.
bus
busSakal
Updated on

Jalgaon News : एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ६६ टक्के सवलत दिली आहे. या सवलतीतून केवळ ३३ टक्के रक्कम भरून पास काढता येणार आहे. भुसावळ आगाराचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील शाळा, विद्यालय, महाविद्यालयांमध्ये मुख्यांध्यापकांच्या भेटी घेऊन पास वितरणला सुरवात केली आहे. शाळा, विद्यालये महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. (distribution of ST pass from school under special campaign started )

तशा सूचना एसटी महामंडळाने स्थानिक प्रशासनाला दिल्या असून, नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थांना घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने एसटीच्या माध्यमातून ६६ टक्के इतकी सवलत दिली आहे. त्यात केवळ ३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येणार आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण देखील केले जाणार आहे.

यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर रांगेत उभे राहून पास घेण्याची आता गरज नाही. शाळेतील प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी शाळेकडून आगारांना दिली जाईल. त्या यादीनुसार संबंधित विद्यार्थ्यांना त्यांचे एसटी पास शाळेत देण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. (latest marathi news)

bus
Jalgaon News : ‘वाघूर’च्या पुलावरील वाहतूक अखेर बंद; 20 दिवसांत होणार काम

या संदर्भात मंगळवारपासून (ता. १८) भुसावळ एसटी प्रशासनातर्फे तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये विशेष मोहीम राबविण्यास सुरवात झाली आहे. तालुक्यातील भुसावळ शहर, वरणगाव, साकेगाव, कुऱ्हा, खडका, साकरी, किन्ही, विल्हाळे, पिंपळगाव, तळवेल, बोहार्डी, आचेगाव आदी विविध गावांतील शाळांच्या मुख्याध्यापकांच्या एसटी आगाराचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या भेटी घेऊन पास वितरणाला सुरवात केली आहे.

आगार व्यवस्थापकांचे पत्र

तत्पूर्वी सर्व शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या भुसावळ आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात प्रवास करून शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले. या अभिनव योजनेचा लाभ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे.

''विद्यार्थ्यांना सवलत पासचे वितरण सुरू झाले आहे. त्या दृष्टीने मी आणि आमचे सहकारी भुसावळ शहरासह तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांत भेटी देत आहोत. प्रसंगी नाहाटा महाविद्यालय, के. नारखेडे, वरणगाव महात्मा गांधी विद्यालयांसह प्रवासी विद्यार्थी असतील अशा प्रत्येक शाळेत भुसावळ एसटी आगाराचे कर्मचारी पास वितरण करणार आहेत.''- राकेश शिवदे, आगारप्रमुख, भुसावळ.

bus
Jalgaon News : विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या शंभरावर; पाणीपुरी विक्रेता ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.