जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढताच

नवे ३३८ बाधित; आयसीयूतील रुग्णही वाढले
Jalgaon Corona update
Jalgaon Corona update sakal
Updated on

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कायम असून, रुग्णसंख्येचा आलेखही वाढताच आहे. रविवारी (ता. २३) जिल्ह्यात नव्याने ३३८ रुग्णांची भर पडली, तर दिवसभरात २२१ रुग्ण बरे झाले. चिंतेची बाब म्हणजे आयसीयूतील रुग्णांची संख्या आता १६वर पोचली आहे.(Jalgaon Corona update)

Jalgaon Corona update
नियंत्रण रेषेवर बेपत्ता झालेल्या तरुणाला चीनमधून आणण्याची प्रक्रिया

जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गाचा वेग चांगलाच वाढला आहे. जळगाव व भुसावळवरती वाढती रुग्णसंख्या आता ग्रामीण भागातही वाढू लागली आहे. रविवारी ॲन्टिजेन व आरटीपीसीआर अशा दोन हजार ७३१ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी ३३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. दिवसभरात २२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजार २४४ झाली आहे. पैकी ५९ रुग्णांमध्येच लक्षणे असून, उर्वरित तीन हजार १८५ रुग्ण लक्षणेविरहित आहेत. सध्या ७२ रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असून, उर्वरित तीन हजार ११३ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.

Jalgaon Corona update
केंद्राने बेताने खर्च करावा : रघुराम राजन

गंभीर रुग्ण वाढले

लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण ९५ टक्क्यांहून अधिक असले तरी रविवारी गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता निर्माण झाली आहे. रविवारी आयसीयूत १६ रुग्ण, तर ऑक्सिजनवर सहा रुग्ण होते.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर ११८, जळगाव ग्रामीण ६, भुसावळ ८७, अमळनेर २०, चोपडा २६, पाचोरा २, भडगाव ५, धरणगाव १३, यावल ६, जामनेर ८, रावेर ३, चाळीसगाव २५, मुक्ताईनगर ५. बोदवड, पारोळा व एरंडोल तालुक्यात रविवारी एकही रुग्ण समोर आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.