जळगाव जिल्हा ‘पाणीदार’ करणार : जिल्हाधिकारी राऊत

Collector Abhijit Raut and villagers inspecting the ongoing works by JCB for Amrit Sarovar.
Collector Abhijit Raut and villagers inspecting the ongoing works by JCB for Amrit Sarovar.esakal
Updated on

जळगाव : ‘आजादी का अमृतमहोत्सव’ (Azadi ka Amrit mohotsav) अंतर्गत जळगाव जिल्हा ‘पाणीदार’ करण्याचा ध्यास आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी ‘सकाळ’ला दिली. पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी व त्या परिसरातील विहिरी, कूपनलिकांची पातळी वाढावी, जिल्ह्यात पाणीटंचाई भासू नये, यासाठी जिल्ह्यात १०० ठिकाणी अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात येत आहे.

तसेच जिल्ह्यात ‘एक गाव-एक तलाव’ अशीही योजना राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. यामुळे मोठ्या प्रमाणात पातळी वाढून, पाणीटंचाई मिटण्यास मदत होणार आहे. (Jalgaon District Collector abhijit Raut statement about one village one lake latest marathi news)

जलशक्ती अभियानांतर्गत शंभर ठिकाणी अमृत सरोवर तयार करण्यासाठी तेवढ्याच ठिकाणी मार्किंग करण्यात आले आहे. १७ ठिकाणी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जलसंधारण, वन, जलसंपदा, कृषी विभाग, मनरेगा, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत या तलावांची निर्मिती होईल.

लोकसहभाग महत्त्वाचा

१५ ऑगस्टपर्यंत जास्तीच जास्त अमृत सरोवरांची निर्मिती केली जाईल. १५ ऑगस्टला स्थानिकांच्या हस्ते त्या ठिकाणी ध्वजवंदन करण्यात येईल. कोरोना काळात लोकसहभागातून अनेक रुग्णालयांत सुविधा देण्यात आल्या.

विविध साहित्य पुरविले गेले. यामुळे अनेकांचे प्राण वाचले. लोकसहभाग चळवळीचे मोठे यश मिळाले होते. यामुळे शासकीय विभागासोबतच लोकसहभागातून अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात येत आहे. नागरिकांच्या सहभागातून सरोवरांची निर्मिती झाली. त्यात पाणी साचले की ‘जल’गाव ‘पाणीदार’ होईल.

Collector Abhijit Raut and villagers inspecting the ongoing works by JCB for Amrit Sarovar.
ओझरखेड-वरखेडा रस्त्यावरील अर्धा पुलच गेला वाहून; शेतकरी व विद्यार्थ्यांचे हाल

एक गाव-एक तलाव

चाळीसगाव तालुक्यात अनेक गावांत सामाजिक संस्था, लोकसहभागातून तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. या तलावात वर्षभर पाणी असते. ते सर्वांच्याच उपयोगी येते. सिंचनाखाली मोठे क्षेत्र येते. हाच धागा पकडत जिल्ह्यातील सर्व गावांत ‘एक गाव-एक तलाव’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

अमृत सरोवरासाठी कामे सुरू असलेली ठिकाणे अशी ः

चाळीसगाव तालुक्यातील अभोणे तांडा, अडगाव, मुंगी, ब्राह्मण शेवगे, एरंडोल तालुक्यात खर्ची खुर्द, एरंडोल, वरखेडी पाझर तलाव, नागदुली, विखरण गाव तलाव, जळगाव तालुक्यात कंडारी पाझर तलाव, वसंतवाडी गाव तलाव, कोढ तलाव तालखेडे ग्रामपंचायत (ता. मुक्ताईनगर), कुसुंबा बुद्रुक पाझर तलाव, गुलाबवाडी पाझर तलाव, पाल पाझर तलाव, जिन्सी पाझर तलाव (सर्व रावेर), वाकी पाझर तलाव, वरखेड बुद्रुक तलाव (बोदवड).

Collector Abhijit Raut and villagers inspecting the ongoing works by JCB for Amrit Sarovar.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या पत्नी, कवयित्री उर्मिला कराड यांचे निधन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()