जळगाव जिल्ह्याचे अर्थचक्र रुळावर येण्यास सुरवात

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दरही दोन टक्क्यांच्या आत आला आहे.
 jalgaon market
jalgaon market jalgaon market
Updated on

जळगाव ः गेल्या अडीच महिन्यांपासून अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्वच प्रकारची दुकाने कोरोना (corona) निर्बंधामुळे बंद होती. मंगळवारपासून ती दुकाने सुरू झाल्याने व्यापाऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी अनेक दिवसांपासून रखडलेली कपडे खरेदी, सोने-चांदी (gold-Silver) खरेदी, मोबाईल, इलेक्ट्रॉनिकसह इतर वस्तूंच्या खरेदीसाठी शहरातील विविध व्यापारी संकुलातील (Market) दुकानांत धाव घेतली. यामुळे सुनेसुने असलेली व्यापारी संकुलात आता नागरिकांच्या वर्दळीने नवचैतन्य आले आहे.

(jalgaon district economic cycle begins get on track)

 jalgaon market
जागतिक पोपट दिवस..आणि निर्सगाचा पोपटांना असाही तडाखा !

कोरोना महामारीचे रुग्णसंख्या शहरासह जिल्ह्यात झपाट्याने वाढत असल्याने ५ एप्रिलपासून ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बंध सुरू झाले. १६ एप्रिलपासून अत्यावश्‍यक दुकानांची वेळी सकाळी सात ते ११ अशी करण्यात आली होती. नंतर संचारबंदीचे निर्देश होते. अत्यावश्‍यक सेवेतील किराणा, भाजीपाला, फळे, दूध डेअरी वगळता इतर दुकाने बंदच असल्याने त्या दुकानदार, व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले होते. दरम्यान कोरोनाचे रुग्ण कमी होण्यासाठीचा निर्बंध, गर्दी टाळणे, संचारबंदी हे उपाय महत्त्वाचे ठरल्याने गेल्या महिन्यात रुग्णसंख्या कमी झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दरही दोन टक्क्यांच्या आत आला आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध कायम ठेवत दुकानांना सुरू करण्याची परवानगी दिली. यामुळे आजपासून सलून, स्पा, ब्यूटिपार्लर, मॉल्स वगळता इतर दुकाने मंगळवारपासून सुरू झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी सात ते दुपारी दोनदरम्यान दुकाने सुरू होती. सर्वच दुकानांमध्ये साहित्य खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र प्रत्येकाला मास्क लावल्याशिवाय वस्तू दिल्या जात नव्हत्या. गर्दी न करण्याचे आवाहनही व्यापारी बांधव करीत होते.

व्यापाऱ्यांमध्ये उत्साह
रमेश मतानी (अध्यक्ष- सेंट्रल फुले मार्केट असोसिएशन) ः गेल्या ५६ दिवसांपासून आमची दुकाने बंद होती. आज दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळाल्याने सर्वच व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बंदचा काळात आर्थिक स्थिती बिकट झाली होती. आता ती हळूहळू पूर्वपदावर येईल. आम्ही कोरोना नियमांचे पालन करीत आहोत.

 jalgaon market
नोकरी सुटली..तरी नाउमेद झाला नाही, आणि बनला ‘मोबाईल चहावाला’

नियम पाळून व्यापार करा
पुरुषोत्तम टावरी (कॅट असोसिएशन वरिष्ठ उपाध्यक्ष) ः आगामी पंधरा दिवसांत कोरोनाचे रुग्ण न वाढू देण्यासाठी व्यापारी बांधवांनी खबरदारी घ्यावी. जर रुग्णसंख्या आपल्या ग्राहकांच्या गर्दीमुळे वाढली तर पुन्हा आपल्याला लॉकडाउन स्वीकारावे लागेल. यामुळे ग्राहक येताच त्यांना सॅनिटाइज करा, मास्क लावण्यास सांग. कोरोनाचे नियम पाळले तर पंधरा दिवसांनंतही दुकाने आपल्याला सुरू ठेवता येतील.


ग्राहकांनीही नियम पाळावे
ललित बरडिया (सचिव- जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ) ः गेल्या अडीच महिन्यांत सर्वच व्यापाऱ्यांचे मिळून सुमारे सहा हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आज दुकाने सुरू झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आहे. कोरोनाचे नियम व्यापारी पाळतो.
ग्राहकांनीही नियम पाळले तर दोघांच्याही फायद्याचे आहे. ग्राहक व्यापाऱ्यांचा देव असतो. व्यापारी त्याची सेवा करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.