जळगाव : जिल्हयात ई-पीक पाहणीचे ७६.४२ टक्के काम पूर्ण झाले असून नाशिक विभागात जिल्हा अव्वल आहे. २० आणि २१ सप्टेंबर रोजी यासाठी विशेष मोहीम म्हणून हे काम हाती घेतल्यामुळे हा आकडा उद्दिष्टाच्या जवळ जाऊ शकतो. ई-चावडीमध्ये जिल्ह्यातील २२ गावचे कामे शिल्लक असून येत्या काही दिवसांत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. ई-पीक पाहणीत रावेर, अमळनेर, भुसावळ तालुक्यांनी उत्तम काम केले आहे. (District leader in e peek inspection 22 villages work left)
जळगाव, चाळीसगाव आणि बोदवड तालुक्यांना अधिक गतीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात १९४ नवीन तलाठी आणि ७२० मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना २० आणि २१ सप्टेंबर रोजी ई-पीक पाहणीच्या विशेष मोहिमेत सहभागी करून घेतले आहे. सेवा हक्क कायद्याप्रमाणे जिल्ह्यातील ९९.३३ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यात फक्त २११ अर्जाचा निपटारा वेळेत करता आला नाही.
‘डीसीएस’ पथदर्शी प्रकल्प
केंद्राच्या कृषी मंत्रालयाने खरीप हंगाम २०२३ पासून डिजिटल क्रॉप सर्व्हेचा (डीसीएस) पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. चालू वर्षासाठी जिल्ह्यात यासाठी भुसावळ तालुक्याची निवड केली असून ८६.४३ टक्के काम पूर्ण झाले आहे. सर्व खाणी चालकांची पुढच्या आठवड्यात बैठक घेणार असून तसे पत्र पाठवल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. (latest marathi news)
पोट खराबी क्षेत्र वहितीखाली आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असून जिल्ह्यात ४६ हजार २१० हेक्टर एवढे क्षेत्र पोट खराबीचे असून त्यातील ५८१०.१७ हेक्टर एवढेच क्षेत्र वहितीखाली आणता आले आहे. अजूनही ४० हजार ३७० हेक्टर क्षेत्र पोट खराबीचे आहे. नदी, नाला आणि शासनाच्या जमिनीचाही यात अंतर्भाव असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली.
१०२ वाहने जप्त
अवैध गौण खनिज व वाहतूक यावरच्या दंडात्मक कारवाईत २०२३-२४ मध्ये ८४१ वाहने जप्त केली होती. त्यातील ३२० वाहने दंडाची रक्कम भरली नसल्यामुळे प्रशासनाच्या कस्टडीत आहेत. तर चालू वर्षात २६५ वाहने जप्त केली असून त्यातील १०२ वाहने दंडाची रक्कम भरली नाही म्हणून कस्टडीत आहेत. ४२२ जप्त वाहने लिलावात काढली असून त्याची कार्यवाही आर. टी. ओ. कार्यालयाकडून सुरु आहे. जिल्ह्यात एकूण २५ खाणी आहेत. त्यातल्या दोन बंद केल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या २३ खाणी पैकी ९ शासकीय जागेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.