Jalgaon District Milk Union Election : दूध संघ वाचविणे हेच आमचे ध्येय : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil news
Gulabrao Patil newsesakal
Updated on

जळगाव : जिल्हा दूध संघ वाचविणे हेच आमचे एकमेव ध्येय आहे. त्यामुळे मतदार आम्हाला निश्‍चित साथ देतील, असा विश्‍वास जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजप- शिंदे आघाडीचे नेते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. दूध संघाच्या निवडणुकीसंदर्भात झालेल्या मतदारांच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (Jalgaon District Milk Union Election Our goal is to save milk union statement by Gulabrao Patil Jalgaon news)

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Gulabrao Patil news
Jalgaon Crime News : सट्टा जुगारावर अप्पर अधीक्षक Action मोडवर

भाजप- शिवसेना शिंदे गटातर्फे शुक्रवारी जळगाव व धरणगाव तालुक्यातील मतदारांचा मेळावा औद्योगीक वसाहतीतील हॉटेल मैत्रेयमध्ये झाला. आमदार किशोर पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा बँकेचे संजय पवार आदी उपस्थित होते. संजय पवार यांनी सूत्रसंचालन करीत मतदारांना जिल्हा बँकेतील उमेदवारीबाबत माहिती दिली.

मेळाव्याबाबत माहिती देताना पालकमंत्री पाटील म्हणाले, की जिल्हा दूध संघ वाचविण हेच आमचे ध्येय आहे. त्यामुळे आम्ही मतदारांसमोर आमची भूमिका मांडत आहोत. मतदारांनाही आमची भूमिका पसंत पडत आहे. गेल्या सात वर्षांत संचालक काळात चांगले काम झाले नाही, ते प्रशासकांच्या तीन महिन्यांच्या काळात झाले, असे मत काही मतदारांनी मेळाव्यात व्यक्त केले. त्यामुळे मतदारामध्ये सध्याच्या दूध संघातील सत्ताधाऱ्यांविरुद्ध प्रचंड नाराजी आहे. आमचा लढा शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेतकरी केंद्रबिंदू ठेवूनच आम्ही निवडणूक लढवीत आहोत. त्यामुळे आमच्या गटाला निवडणुकीत यश मिळेल, याचा आम्हाला विश्‍वास आहे.

Gulabrao Patil news
Jalgaon Milk Union Fraud : संशयितांना जिल्हा न्यायालयाचा जामीन; दूध संघ आवारात जाण्यास मनाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()