District Milk Union : खडसेंना सावधानतेचा इशारा, महाजन-पाटलांना ऊर्जा!

Jalgaon Milk Union election news
Jalgaon Milk Union election newsesakal
Updated on

जळगाव : जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत पॅनल आणि पक्षीय गणित असले, तरी मतदारांनी चाणाक्षपणे मतदान केले. अर्थात त्याला इंग्रजीत त्याला ‘क्रॉस वोटींग’ मतदान म्हटले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याचे सध्याचे राजकीय चित्रही समोर आले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व शिवसेनेतून फुटून शिंदे गटात गेलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना या विजयातून ऊर्जा मिळाली आहे.

एकनाथ खडसे यांना राजकीय क्षेत्रातही सावधानतेचा इशारा मिळाला आहे. गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील, पराग वसंतराव मोरे, प्रमोद पांडुरंग पाटील यांनी विजय मिळवून ‘राष्ट्रवादी’ला सलाईन दिली आहे, तर मंगेश चव्हाण यांचे नेतृत्व उजळून निघाले आहे. आगामी निवडणुकींसाठी महाविकास आघाडीला मोठे आव्हान असणार आहे. (Jalgaon District Milk Union Election Update Jalgaon News)

Jalgaon Milk Union election news
Jalgaon News : रेमंड कामगारांचे कामबंद आंदोलन

जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाची निवडणूक ‘सहकार’ गटाची असली, तरी ती खऱ्या अर्थाने पक्षीय पातळीवर लढली गेली, असे म्हटले बोलले जात आहे. माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी होती. त्यांचे सहकार पॅनल, तर मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे गट होता. त्यांचे शेतकरी पॅनल होते.

प्रचार करताना पॅनल व पक्षीय गटाच्या माध्यमातून संयुक्त प्रचार झाला असला, तरी मतदारांनी दिलेला कौल मात्र बरेच काही सांगून जात आहे. मतदारांनी पॅनल टू पॅनल मतदान न करता अगदी चाणाक्षपणे व उमेदवार शोधून मतदान केले आहे. १९ मते देताना मतदारांनी आपल्या उमेदवारांना बरोबर शिक्का दिला आहे. त्यामुळे यातून त्यांनी नेत्यांना धडा दिला आहे.

मतांचे बूथनिहाय परीक्षण केल्यास तालुकानिहाय, तसेच राखीव मतदारसंघात एखादा तालुका वगळल्यास सर्वच मतदारसंघात असमान मते आहेत. त्यामुळे उमेदवारांनी पॅनलसोबत वैयक्तिक विजयासाठीही वेगळी कंबर कसल्याचे दिसले. यात काही उमेदवारांना यश आले, काही उमेदवार मात्र अपयशी ठरले.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Jalgaon Milk Union election news
Jalgaon News : जिसके हाथ में होगी लाठी... भैंस वही ले जायेगा!

खडसेंना बदलावे लागणार पवित्रे

राष्ट्रवादी कॉंग्रसचे आमदार एकनाथ खडसे यांनी पॅनलचे नेतृत्व केले. त्यांच्या पत्नी, विद्यमान चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी निवडणूक लढविली. त्यांच्याविरुद्ध चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मोठे आव्हान उभे केले होते. मंदाकिनी खडसे यांचा तब्बल ७६ मतांनी पराभव झाला. मंदाकिनी खडसे यांना भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यांनी मोठे मताधिक्य दिले. एरंडोल तालुक्यातही त्यांना आमदार चव्हाण यांच्याबरोबरीने मते मिळाली. इतर तालुक्यात मात्र त्यांच्या मतांची मोठी घसरण झाली. या विजयासाठी श्री. खडसे यांनी आपली संपूर्ण ताकद लावली होती. मात्र, या पराभवातून एकनाथ खडसे यांना राजकारणात सावधानतेचा इशारा मिळाला आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे श्री. खडसे यांना आगामी काळात यशासाठी राजकीय पवित्रे बदलावी लागतील.

‘खोक्या’चे शुक्लकाष्ट राहणारच मागे

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना या विजयाने ऊर्जा मिळाली आहे. सहकार क्षेत्रात गुलाबरावांचे या यशाने पर्दापण झाले आहे. त्यांच्या गटाला तब्बल १५ जागा मिळाल्याने त्यांचे यश अधोरेखीत झाले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पालिका निवडणुकीच्या यशाची नांदी ते या यशातून शोधत आहेत. मात्र, विरोधकांच्या आरोपाचे ‘पेटी’, ‘खोका’ हे शुक्लकाष्ट त्यांच्या मागे राहणार आहे, हे त्यांना विसरता येणार नाही.

Jalgaon Milk Union election news
Eknath Shinde : हम 'सर्वांगीण' विकास करना चाहतें हैं... मुख्यमंत्र्यांचं हिंदी ऐकलं का?

देवकर, मोरे, पाटलांचा विजय

जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया देवकर, राष्ट्रवादीचे माजी खासदार वसंतराव मोरे यांचे चिरंजीव पराग मोरे, अमळनेरचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील व चाळीसगावचे राष्ट्रवादीचे प्रमोद पाटील यांच्या विजयामुळे महाविकास आघाडीला दिलासा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला सलाईन मिळाली आहे. मात्र, भाजपचे मंगेशशास्त्र मुक्ताईनगरातून यश मिळविते. मात्र, त्यांच्या चाळीसगावात हे अस्त्र फेल होते आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे पाटील यशस्वी होतात.

हे कोडे सोडवायला तज्ज्ञांची गरज नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चार विजयांनी बरेच काही राजकीय गणिताचे कोडे आगामी काळात दिसणार आहे. त्यात माजी आमदार दिलीप वाघ कोणाचे, याचेही अद्याप कोडेच आहे. ते आगामी विधानसभेपर्यंत सुटेल. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांचा चार मतांनी झालेला पराभव मात्र पक्षाला जिव्हारी लागणारा आहे. राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी उघड भूमिका घेऊन भाजप-शिंदे गटाकडून निवडणूक लढविली. त्यांना विजय मिळाला आहे. मात्र, ते अद्यापही राष्ट्रवादीतच असल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला आता आपली दिशा ठरवावी लागणार आहे, हे निश्‍चित आहे.

निवडणुकीत शिंदे-भाजप गट दिसत आहे. महाविकास आघाडी असली, तर या ठिकाणी राष्ट्रवादीच ठळक दिसली. शिवसेना (ठाकरे गट), कॉंग्रेसही दिसत नाही. त्यामुळे ‘महाविकास’ आघाडीचे अपयश म्हणणे कितपत योग्य ठरेल, असा प्रश्‍नही आता आहे. मात्र, आगामी निवडणुकीसाठी ‘महाविकास’ आघाडीला यशासाठी वेगळी रणनीती आखावी लागणार हे मात्र या निवडणुकीने दाखवून दिले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Jalgaon Milk Union election news
Jalgaon Crime News : व्यवसायासाठी माहेरून तीन लाख आण; सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.