जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघात लोणी व दूध भुकटीत सव्वाकोटीचा अपहार झाल्याचा गुन्हा शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे यात पोलीसांनीच या प्रकरणी फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या संघाच्या चेअरमन आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Jalgaon District Milk Union Fraud case filed against Eknath Khadse wife Mandakini Jalgaon Latest Crime News)
भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव जिल्हा दूध संघात अपहार झाल्याची तक्रार दिली होती,त्यात त्यांनी म्हटले होते, कि जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा, कार्यकारी संचालक तसेच काही कर्मचाऱ्यांनी सव्वा कोटी रूपयाचे १४ टन लोणी व ९ टन दूध पावडरचा अपहार झाल्याची लेखी तक्रार दिली होती.
या प्रकरणी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांचा जबाब घेण्यात आला त्यावेळी त्यांनी अपहार झाल्याचे म्हटले होते. परंतु त्यांनीच नंतर हा अपहार नसून चोरी झाल्याची तक्रार करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करून घ्यावा यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले होते.
या प्रकरणी पोलीसांना तपास केला असता जिल्हा कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी ज्या कर्मचाऱ्यांना निलंबीत केले होते. त्यांच्या निलंबन आदेशात अपहार नमूद केले होते. हाच मुददा लक्षात घेवून पोलीसांना दूध संघाची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे चेअरमन आहेत. या ठिकाणी सर्व पक्षीय संचालक मंडळ कार्यरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.