Jalgaon Milk Union Fraud : संशयितांना जिल्हा न्यायालयाचा जामीन; दूध संघ आवारात जाण्यास मनाई

District Milk Union News
District Milk Union Newsesakal
Updated on

जळगाव : जिल्हा दूध संघातील अपहार प्रकरणात अटकेतील संशयितांना शुक्रवारी (ता. २५) जळगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला. यात सोमवार, शनिवार पोलिस ठाण्यात हजेरी, दूध संघ आवारात आरोपपत्र दाखल होईपर्यंत जाण्यास प्रतिबंध, या अटी आहेत. (Jalgaon district Milk Union Fraud District Court Bail to Suspect No entry into milk union premises Jalgaon News)

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

District Milk Union News
Balasaheb Thorat Statement : आत्मविश्वास डगमगला की ज्योतिष आठवतो

जिल्हा दूध संघात बेकायदेशीरपणे अखाद्य तूप (स्पॉइल्ड फॅट) बनविणे आणि ते खाद्यपदार्थ म्हणून चॉकलेट फॅक्टरीला विकून लाखोंचा अपहार केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सहा संशयितांना अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडीत तपासाला चालना मिळाल्यानंतर न्यायालयाने सहा संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली. अटकेतील सर्व संशयितांतर्फे जामिनासाठी अर्ज करण्यात आले. अर्जांवर न्या. खंडारे यांच्या न्यायालयात दोन्ही पक्षांचा प्रदीर्घ युक्तिवाद होऊन कार्यकारी अधिकारी मनोज लिमये, हरी पाटील, किशोर पाटील, अनिल अग्रवाल, रवी अग्रवाल व चंद्रकांत पाटील अशा सहा संशयितांना सशर्त जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश न्या. आर. जे. खंडारे यांच्या न्यायालयाने दिले.

जामिनाच्या अटी-शर्तीनुसार संशयितांनी दाखल गुन्ह्यातील तपासाला संपूर्ण सहकार्य करावे. आठवड्यात दोन दिवस सोमवार-शनिवार पोलिस ठाण्यात हजेरी बंधनकारक राहील. जळगाव जिल्‍हा दूध संघाच्या आवारात जामिनावर सुटलेल्या संशयितांपैकी कुणालाही जाता येणार नाही. कुठलाही हस्तक्षेप करता येणार नाही, किमान या गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटीचे पालन करावे लागेल. साक्षीदारांवर दबाव आणू नये, अशा अटींसह जामिनावर मुक्तता करण्यात आली.

कलम-३२८ नॉट ॲप्लिकेबल

दूध संघात बी-ग्रेड अर्थात, अखाद्य तूप असल्याची माहिती तपासात समोर आली. परंतु अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केली असता ते मानवी आरोग्यास हानीकारक असे स्निग्ध पदार्थ असल्याचा अहवाल दिला होता. परंतु पोलिसांनी त्याअनुषंगाने लावलेले कलम-३२८ नॉट अॅप्लिकेबल असल्याचे न्यायालयाने म्हटले असून, जामीन मिळण्यासाठी हाच मुद्दा महत्त्वाचा ठरल्याचे सांगण्यात येत आहे.

District Milk Union News
Nashik News : पोषण आहार अनुदान वाढले; आमचे कधी ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()