जळगाव : केंद्र व राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ आदी वस्तूंचा मोफत लाभ दिला जात आहे. रेशन दुकानातील तांदूळ मूल्यावर्धित पोषणतत्त्वयुक्त तांदूळ असल्याचा दावा जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांनी केला आहे. (Rumors of plastic rice from ration shops)
गेल्या दोन वर्षांपासून शासन निर्देशानुसार स्वस्त धान्य दुकानांतून मूल्यावर्धित करून तांदूळ पुरवठा केला जात असून, स्वस्त धान्यात तांदळात प्लॅस्टिकचा तांदळाचा पुरवठा केला जात असल्याचा अपप्रचार केला जात आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत १७ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळवाटपास मान्यता दिली आहे. मूल्यावर्धित पोषणतत्त्वयुक्त तांदळात १०० दाण्यांमागे १ दाणा, असे प्रमाण आहे. या एक दाण्यात अनेक पोषणामूल्यांचा समावेश आहे. त्यामुळे हे तांदळाचे दाणे वेगळे दिसतात.
"स्वस्त धान्य दुकानांतून मिळणारा तांदूळ मूल्यावर्धित पोषणतत्त्वाचा असून, प्लॅस्टिकयुक्त नाही. मूल्यवर्धित तांदूळ रेशन दुकानातून वाटप होत आहे. मूल्यावर्धित तांदूळ खाण्यायोग्य असून, याबाबत अफवा पसरवू नये. त्यामुळे कोणताही प्लॅस्टिकचा तांदूळ वितरित केला जात नाही."
- संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव
फोर्टिफाईड तांदूळ म्हणजे काय?
लोह (आर्यर्न), फॉलिक ॲसिड, विटामिन-१२ या पोषणमूल्यांनी युक्त असलेला तांदूळ म्हणजे फोर्टिफाईड राइस. राज्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये आता फोर्टिफाइइड राइस पुरवला जातो. पाण्यामध्ये टाकल्यानंतर काही सेकंद यातील फोर्टिफाइइड राइसचे दाणे पाण्यावर तरंगतात. त्यामुळे तो प्लॅस्टिकचा आहे, असा गैरसमज पसरतो. मात्र, तो प्लॅस्टिकचा नसून कृत्रिमरीत्या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त असा तांदूळच असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.