Monsoon Season : शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या ६९.२ टक्के पावसाने जिल्ह्यातील पाणीटंचाई मिटली आहे. जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यापासून आतापर्यंत सुमारे ९४ गांवांमध्ये पाणीटंचाई जाणवत होती. त्या गावांमध्ये ११३ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. आता एकाही गावात टँकर सुरू नसल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात आतापर्यंत ४९ टक्के जलसाठा झाला आहे. (district tanker free 69 percent rain in city )