Jalgaon News : जिल्हा शिक्षक पतपेढीची होणार चौकशी; वसतिगृह, अन्य प्रकरणात गैरव्यवहार

Jalgaon : जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीने केलेली प्लॉट खरेदी, इमारत बांधकाम, नोकर भरतीतील कथित गैरव्यवहाराच्या अनेक तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या होत्या.
District Teachers Credit Fund Building
District Teachers Credit Fund Buildingesakal
Updated on

Jalgaon News : जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीने केलेली प्लॉट खरेदी, इमारत बांधकाम, नोकर भरतीतील कथित गैरव्यवहाराच्या अनेक तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या होत्या. त्यावर सहकार विभागाने या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सहकार विभागाच्या पुणे कार्यालयाने सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ नुसार चौकशी करण्याचे आदेश जळगाव जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. (Jalgaon District teacher credit fund will be investigated)

तक्रारदार तथा पतपेढीचे सभासद विनोद दिलीप महेश्री यांनी पतपेढीतील मनमानी कारभार, विविध कामांतील गैरव्यवहार यासंबंधी वेळोवेळी जिल्हा स्तरापासून राज्यस्तरापर्यंत चौकशी करण्यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या या लढ्याला चौकशीच्या आदेशामुळे यश आले आहे.

सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था. (latest marathi news)

District Teachers Credit Fund Building
Jalgaon Lok Sabha Election : जिल्ह्यात मतदार संख्येत 18 हजारांची वाढ; आता 35 लाखांवर मतदार

जळगाव यांच्या कार्यकक्षेत जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी येत असल्याने याप्रकरणी महेश्री यांचे तक्रार अर्जावर तत्काळ नियमानुसार सखोल चौकशी करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित अर्जदार व कार्यालयास करण्यात यावे असे पत्रात म्हटले आहे.

पतपेढीने गत काळात कोट्यवधी रुपये खर्च करुन जागा घेतली, त्यावर वसतिगृह बांधले. त्या वसतिगृहाचा विद्यार्थ्यांना किती लाभ झाला? यासह अन्य प्रकरणांबाबत महेश्री यांनी तक्रार केली होती. अशा सर्व प्रकरणांची चौकशी या आदेशान्वये होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

District Teachers Credit Fund Building
Jalgaon News : मुक्ताईनगर तालुक्यातून महामार्ग नेण्यास विरोध; अंतुर्लीच्या शेतकऱ्यांची भूमिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.