Jalgaon News : अमळनेर शहरात घरोघरी होणार सर्वेक्षण; प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वेक्षण

Jalgaon : डेंगी, मलेरिआ यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वेक्षण आजपासून (ता.३) सुरू करण्यात आले आहे.
Municipal health workers taking measures to prevent the outbreak of dengue, malaria in Tambepura area.
Municipal health workers taking measures to prevent the outbreak of dengue, malaria in Tambepura area.esakal
Updated on

Jalgaon News : शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियान व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मॉन्सून कालावधीत डेंगी, मलेरिआ यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वेक्षण आजपासून (ता.३) सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी नियुक्त पथकातील आरोग्य कर्मचारी शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन घरोघरी सर्वेक्षण करणार आहेत. (Door to door survey to be conducted in Amalner city to prevent epidemics )

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बाहेकर, अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, जिल्हा हिवताप अधिकारी तुषार देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवकांच्या पथकांद्वारे हे सर्वेक्षण आज तीन जूनपासून सुरू करण्यात आले आहे. या आरोग्य पथकांद्वारे शहरातील प्रत्येक प्रभागामधील नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण तथा तपासणी करण्यात येणार आहे.

त्यात नागरिकांमध्ये जनजागृती करणे, दूषित कंटेनर खाली करणे, पाण्याच्या डबक्यांत क्रूड ऑईल टाकणे, व नागरिकांना आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याच्या सूचना करणे, परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करणे आदी कामकाज पथकांद्वारे करण्यात येत आहे. शिवाय नगरपालिका स्वच्छता विभागातर्फे शहरात नियमित कीटकनाशक धूरळणी व फवारणी करण्यात येत आहे. ही सर्वेक्षण मोहीम आज तीन जुलैपासून सुरू करण्यात आले आहे.

येत्या नऊ जुलैपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेसाठी एकूण ३५ आरोग्य कर्मचाऱ्यांची विविध पथके तयार करण्यात आली आहेत. त्यात आरोग्यसेवक, आरोग्यसेविका व आशा वर्कर यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण मोहीम शहरात कार्यन्वीत करण्यात आली आहे. नागरिकांनी पथकातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभाग व नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (latest marathi news)

Municipal health workers taking measures to prevent the outbreak of dengue, malaria in Tambepura area.
Jalgaon News : अंध महिलेची रेल्वे फलाटावरच प्रसूती... बाळंतीण तासभर विव्हळली; दया कुणा ना आली!

''आपल्या अमळनेर शहरात डेंगी व मलेरियाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिक व कुटुंबानेदेखील काळजी घेणे आवश्यक आहे. आपले घर व आपला परिसर नेहमीच स्वच्छ ठेवून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस अवश्य पाळावा.''-तुषार नेरकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, अमळनेर.

''प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यहितासाठीच नगरपालिका व आरोग्य विभागाच्या वतीने हे अभियान राबविण्यात येत आहे. म्हणून शहरातील नागरिकांनी आपल्या घरी आलेल्या आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.''- डॉ. गिरीश गोसावी, तालुका आरोग्य अधिकारी, अमळनेर.

''अभियानांतर्गत आपल्या घरी येणारे पथक ज्या सूचना करतील, त्याचे काळजीपूर्वक पालन करावे व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.''- डॉ. विलास महाजन, वैद्यकीय अधिकारी, नगरपालिका, अमळनेर.

Municipal health workers taking measures to prevent the outbreak of dengue, malaria in Tambepura area.
Jalgaon News : भुसावळ रेल्वेला जूनमध्ये 129 कोटींचा महसूल; डीआरएम इति पांडे यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट कामगिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.