जळगाव : लोकसभेला आम्ही भाजप उमेदवारांचे प्रामाणिकपणे काम करतो. मात्र, विधानसभेला बंडखोर उभे करून दगाफटका होतो, असा जळगाव जिल्ह्यातील इतिहास असल्याचा दावा करीत, या वेळी भाजपचे वरिष्ठ नेते त्याची काळजी घेतील, अशी अपेक्षा शिवसेना नेते तथा कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली. (Dr Shrikant Shinde statement BJP Legislative Assembly)