Jalgaon News : राज्यातील सर्वच कारागृह हाउसफुल : डॉ. सुपेकर

Jalgaon News : जिल्हा उपकारागृहात निम्म्या मनुष्यबळावर क्षमतेपेक्षा दुप्पट कैद्यांचा भार आला आहे. त्यामुळे कारागृहांची अंतर्गत व बाहेरील सुरक्षा भेदत मोठे गुन्हे घडवले जातात.
Jalgaon District Jail
Jalgaon District Jail esakal
Updated on

Jalgaon News : जिल्हा उपकारागृहात निम्म्या मनुष्यबळावर क्षमतेपेक्षा दुप्पट कैद्यांचा भार आला आहे. त्यामुळे कारागृहांची अंतर्गत व बाहेरील सुरक्षा भेदत मोठे गुन्हे घडवले जातात. त्यातूनच बुधवारी (ता. १०) एका कैद्याची बॅरेकमध्ये हत्या करण्यात आली. या घटनेची कारागृह प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, नुसते जळगावचेच नाही तर संपूर्ण राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट बंदिवान आहेत. (Dr. Supekar statement All prisons in state are full)

अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी कारागृह तपासणी आणि औपचारिक चर्चेदरम्यान दिली. कारागृहे हे यातनागृहे नसून ते सुधारगृहे आहेत, या दृष्टीने आपण पाहिले पाहिजे, असेही ते या वेळी म्हणाले. राज्यात एकूण ६० कारागृहे आहेत. नऊ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे आणि एक महिला कारागृह आहेत. या सर्व कारागृहांची एकूण क्षमता २४ हजार ७२२ कैद्यांची आहे.

असे असतानाही प्रत्येक कारागृहात क्षमतेपेक्षा जास्तीचे बंदिवान आहेत. नुसत्या जळगाव जिल्‍हा उपकारागृहातच दुप्पट कैदी आहे, असे नाही. कारागृह ज्याप्रमाणे टीव्ही-चित्रपटात दाखतवतात तसे नसून काळानुरूप त्यात प्रचंड बदल करण्यात आले आहेत.

कैद्यांच्या पुनर्वसन आणि सुधार कार्यक्रमांतर्गत (हिहॅबलिटेशन प्रोग्रॅम) कारागृहात अत्याधुनिक सेवा-सुविधा पुरवल्या जातात. जेणेकरून कैद्यांची मानसिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आणि त्यातूनच गुन्हे करण्याची प्रवृत्ती टाळून तो सुधारणेच्या मार्गाचा अवलंब करेल. (latest marathi news)

Jalgaon District Jail
Jalgaon District Jail : जळगाव कारागृहाची सुरक्षा वाढवणार!

कैद्यांसाठी अत्याधुनिक सुविधा

कारागृहात कैद्यांसाठी ॲलेजिक टेलिफोनिक सुविधा उपलब्ध असून, कुठलाही बंदिवान निश्चित चार लोकांशी त्यात आई-वडील, वकील आणि नातेवाइकांशी बोलू शकतो. व्हिडिओ कॉलिंगची सेवाही सुरू झाली आहे. आठवड्यात एकदा पाच मिनिटे तर महिन्याला २० मिनिटे बोलता येते. ई-प्रिझन सुविधेमध्ये राज्यातील बहुतांश कारागृहांमध्ये आता क्युऑक्स सिस्टिम कार्यान्वित झाली आहे.

कैद्याच्या थम्प इम्प्रेशनद्वारे त्याला त्याच्या केसेबाबत संपूर्ण अपडेट माहिती स्क्रीनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक बॅरेकमध्ये मनोरंजनासाठी टीव्ही लावण्यात आला असून, कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनही देण्यात आले आहे. जेणेकरून स्वच्छ कपडे कैद्यांना परिधान केल्याने आजारांची लागण होणार नाही.

Jalgaon District Jail
Jalgaon News : वीजजोडणी राहिलेल्या पाणीयोजना सुरू करा; मंत्रालयात झालेल्या जलजीवन आढावा बैठकीत मंत्री पाटील यांचे निर्देश

व्हिडिओ कॉलिंगद्वारे कामकाज

कैद्यांची खटल्याच्या कामकाजासाठी न्यायालयात ने-आण करण्यासाठी नेहमीच गार्ड मिळत नसल्याची तक्रार असायची. आता राज्यात बहुतांश कारागृहात व्हिडिओ कॉलिंगद्वारे संशयितांना न्यायालया समक्ष हजर करून त्याद्वारे कामकाजात सहभागी करण्यात येते. जळगाव कारागृहात असे दहा युनिटी सद्यःस्थितीत सुरू आहेत.

अठराशे कर्मचाऱ्यांची भरती

राज्यातील कारागृहांमध्ये कर्मचारी तुटवडा जाणवत असल्याने रिक्त पदांवर भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. शिपाई भरतीसाठी एक हजार ८०० जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू आहे. भरतीनंतर नवे कर्मचारी आल्यावर थोडा भार हलका होण्याची शक्यता आहे.

Jalgaon District Jail
Jalgaon News : हळदीच्या कार्यक्रमात नाचताना जळगाव येथील तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मंडपातच कोसळला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.