Jalgaon Accident : ब्रेक लावताच केबिनचा चुराडा अन् लोखंडी पाइप रस्त्यावर; विचित्र अपघातात चालक थोडक्यात बचावला

Jalgaon Accident : राष्ट्रीय महामार्गावर चालकाने खड्डा चुकविण्याच्या नादात अचानक ब्रेक दाबला आणि ट्रेलरमधील लोखंडी पाइप थेट चालकाच्या केबिनचा चुराडा करीत बाहेर फेकले गेले.
Pipes scattered on the road after a freak accident on the national highway.
Pipes scattered on the road after a freak accident on the national highway.esakal
Updated on

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर चालकाने खड्डा चुकविण्याच्या नादात अचानक ब्रेक दाबला आणि ट्रेलरमधील लोखंडी पाइप थेट चालकाच्या केबिनचा चुराडा करीत बाहेर फेकले गेले. या विचित्र अपघातात चालकाने प्रसंगावधान राखत उडी घेतल्याने सुदैवाने तो बचावला. दूरदर्शन टॉवर ते मन्यारखेडा फाट्यादरम्यान शनिवारी (ता. २१) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. गुजरातमधून ओडिशाकडे लोखंडी पाइप घेऊन एक ट्रेलर जात होता. शनिवारी पहाटे जळगावच्या पुढे काही अंतरावर गेल्यानंतर चालकाने खड्डा चुकविण्यासाठी ब्रेक लावला. (driver narrowly escaped freak accident where cabin smashed as he applied brakes )

मात्र, यामुळे एकावर एक रचलेले अवजड लोखंडी पाइप निसटून थेट चालकाच्या केबिनवर धडकले. केबिनचा पूर्ण चुराडा करून हे पाइप अक्षरशः रस्त्यावर आले. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आसाराम मनोरे यांच्यासह कर्मचारी, तसेच महामार्ग पोलिस, वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी धडकले.

रस्त्याच्या मधोमध ही घटना घडल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. क्रेनच्या साहाय्याने पाइप बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक वाहने गोदावरी महाविद्यालयाच्या मागून मन्यारखेडा फाट्याकडून वळवली. दुपारी साडेबाराच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली. (latest marathi news)

Pipes scattered on the road after a freak accident on the national highway.
Jalgaon Road Accident : महामार्ग नव्हे ‘यमराज’! मृत्यूदर 44 टक्के वाढला; 4 महिन्यांत तब्बल 234 अपघात अन 187 मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.