पारोळा : बँकांमध्ये ग्राहकांना गर्दीमुळे पैसे काढण्याचा धोका कमी व्हावा तसेच त्यांना पैसे काढणे सोयीचे व्हावे, यासाठी विविध बँकांनी आपापल्या शाखांमध्ये तसेच शहरातील विविध भागात ‘एटीएम’ सुरू केले आहेत. मात्र, सध्या मोबाईलवरुन ‘फोन पे’, ‘गुगल पे’, ‘पे टीएम’ यासारख्या ॲपद्वारे ऑनलाईन व्यवहार केले जात असल्याने ‘एटीएम’कडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. पूर्वी जशा रांगा ‘एटीएम’वर लागायच्या तशा रांगा आता कुठेही दिसून येत नाहीत. (Due to online use of digital payments have increased in Parola area )
पहिल्यांदा जेव्हा ‘एटीएम’ शहरात आले, तेव्हा बॅंकेच्या ग्राहकांना त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास पाच ते सहा वर्षे ‘एटीएम’चा वापर खूप वाढला होता. बँकेतून पैसे काढण्यासाठी जाणारे ग्राहक ‘एएटीएम’लाच पसंती देताना दिसत होते. ज्यामुळे वेळ देखील वाचत होता. काही दिवसांनी पैसे भरण्याची सुविधा देखील बऱ्याच बॅंकांच्या ‘एटीएम’वर उपलब्ध झाल्याने ग्राहकांची आणखीन सोय झाली होती. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षापासून डिजीटल पेमेंट आणि कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. अगदी ग्रामीण भागातील ग्राहक देखील आपल्या मोबाईलवरुन दैनंदिन देण्याघेण्याचे व्यवहार करताना दिसतात. त्यामुळे ‘एटीएम’चा वापर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे दिसून येत आहे.
ऑनलाईनची सवय
शहरात सुमारे १५ ते २० राष्ट्रीयकृत बँकांसह शेड्यूल बँका आहेत. राष्ट्रीय महामार्ग ५३ ला लागून शहर असल्याने ग्रामीण भागातील असंख्य बँक खातेधारक शहरात बँकिंग व्यवहार करण्यासाठी येतात. येथील बाजारपेठही मोठी असल्याने लाखोंची उलाढाल होते. अनेक जण सध्या व्यवहार करताना ‘ऑनलाइन’ व्यवहार करणे पसंत करतात. सध्या अनेक जणांकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल असल्याने पैशांच्या देवाघेवाणीसाठी लागणारे ॲप अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये इस्टॉल केले आहेत. (latest marathi news)
त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करण्याची जणू सवयच अनेकांना लागली आहे. बाजारात छोटीशी वस्तू जरी खरेदी केली तरी ग्राहक दुकानासमोर लावलेल्या बारकोडचा वापर करून त्याला पैसे पे करतात. भाजीपाला खरेदी करताना ‘स्कॅनर आहे का?’ असा प्रश्न ग्रामीण भागातील ग्राहक विचारताना दिसतात. त्यामुळे चलनी नोटांचा वापर कमालीचा कमी झाला आहे.
खेड्यांमध्येही वापर
ग्राहकांच्या सोयीसाठी खेड्यांमधील दुकानदारांनी आपल्या दुकानांमध्ये बारकोड पद्धतीने व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे शहरांमध्ये ज्या पद्धतीने ऑनलाइन व्यवहार केले जातात, तसे व्यवहार आता ग्रामीण भागातही होत आहेत. परिणामी, चलनी नोटांचा वापर बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. तर काही खेड्यांमधील ‘एटीएम’चा पूर्वी होत होता, तसा वापर आता होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकही आता शहरी भागातील ग्राहकांप्रमाणे ‘अपडेट’ झाल्याचे सुखावह चित्र ऑनलाइन व्यवहारांवरुन दिसून येत आहे.
सायबर विभागाचे आवाहन
ऑनलाईन बँकिंग व्यवहार करताना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केलेले आहे. कोणत्याही वेबसाईटवर आपली माहिती, बॅंक खात्यांची माहिती, डेबिट किंवा क्रेडीट कार्डची माहिती देऊ नये. सायबर गुन्हेगारांच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक हे सर्वांत सोपे टार्गेट असतात, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी इंटरनेट बँकिंग व सोशल मिडियाचा वापर करताना सावधानता बाळगावी. ऑनलाइन व्यवहार करताना कोणत्याही प्रकारे फसवणूक झाली तर लगेचच जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंद करावी असेही आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.
''भाजी बाजारात बरेच ग्राहक खरेदी करताना ऑनलाइन पद्धतीने पैसे देतात. त्यामुळे वेळही वाचतो.''- गोपाल महाजन, भाजीपाला विक्रेता ः पारोळा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.