Jalgaon Banana News : गेल्या आठवड्यापासून ४५ अंशावरील तापमानामुळे जिल्ह्यातील केळी करपू लागली आहे. केळी घड सटकण्याचे प्रमाण वाढले. सटकलेले घड गुरांना खाद्य म्हणून वापर केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, केळी विमा त्वरीत मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी केली आहे. गेल्या आठ, दहा दिवसांपासून जिल्ह्यातत उष्णतेचा पारा ४२ अंशाच्या वर व चार, पाच दिवसांपासून ४५ अंशाच्या वर पोहोचला आहे. ( Due to rising temperatures banana orchard damage )
याचा परिणाम केळी पिकावर होत आहे. केळी पीक मोठ्या प्रमाणावर करपू लागले आहे. या तापमानामुळे केळीचे घड सटकण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सटकलेले केळीचे घड व्यापारी घेत नाहीत. यामुळे हे केळीचे घड गुरांना खाद्य म्हणून द्यावे लागत आहे.
आधीच केळीचे भाव कमी झालेले आहेत. बाजार समितीने काढलेल्या भावापेक्षा तीनशे ते चारशे प्रति क्विंटल म्हणजे अवघ्या नऊशे ते हजार रुपये प्रति क्विंटल दराने केळी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे. मागील वर्षी वादळी तडाखा, गारपीट, महापूर यामुळे कोट्यवधी रुपयांचे केळी पिकाचे नुकसान झाले.
शेतकरी आर्थिक कोंडीत
वर्षभरात केळीला मिळणारा कमी भाव यामुळे केळी उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्वरीत विमा रक्कम मिळावी व दिलासा मिळावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.