Jalgaon Banana News : वादळी वारा, उन्हाने नव्या केळीची पाने करपली; केळी उत्पादक पट्यातील शेतकऱ्यांची व्यथा

Jalgaon Banana एवढ्या मोठ्‍या प्रमाणावर नुकसान झाल्याने यातून मार्ग कसा काढायचा हा केळी उत्पादकापुढे प्रश्न आहे.
Banana leaves torn by wind
Banana leaves torn by windesakal
Updated on

Jalgaon Banana News : खानदेशात हजारो हेक्टर वर लागवड करण्यात आलेल्या नव्या लागवडीच्या केळीची पाने या आठवड्यात आलेल्या वादळी वर,तीव्र ऊन आणि पावसामुळे करपली असून जशी कंगव्याच्या दात्यांसारखी झाली आहेत. परिसरात एका बाजूला कडक उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे अशातच झालेल्या वादळी पावसामुळे केळीसह इतरही अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ( due to Stormy wind and heat has cut on banana leaves)

एवढ्या मोठ्‍या प्रमाणावर नुकसान झाल्याने यातून मार्ग कसा काढायचा हा केळी उत्पादकापुढे प्रश्न आहे. काही भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही प्रशासकीय यंत्रणा पंचनाम्याला फिरकले नसल्याची ओरड आहे. तर काही तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नुकसानीच्या पंचनाम्याच्या सूचना देण्याची मागणी केली आहे.

अगोदरच दुष्काळी परिस्थिती असताना या भागातील शेतकऱ्यांनी आहे त्या परिस्थितीत केळीसह इतर पिके कशीबशी घेतली. पिकांची स्थिती चांगली असताना सलग दोन दिवस वादळी पाऊस झाला.विशेष रावेरसह काही तालुक्यात केळीचे झाड उन्मळून पडले. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या तक्रारी असताना नवीन केळीच्या पिकांना दणका बसला आहे. (latest marathi news)

Banana leaves torn by wind
Jalgaon Banana Crop : केळीची फलक भावापेक्षा कमी दराने खरेदी; यावल तालुक्यातील शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

चोपडा तालुक्यातील अनेक गावात नवीन पिकांच्या पानांचे नुकसान झाले. काही वेळ वादळाचा जोर अधिक असल्याने अनेक शेतांमधील पिके जमीनदोस्त झाली. होत्याचे नव्हते झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पानांना चिरा

केळी तसे नाजूक पीक,त्याची पाने भलेही रुंद आणि लांबलचक दिसतात.मात्र उन्हात वादळी वाऱ्यामुळे केली बागांची स्थिती खराब झाली असून काळजी,खबरदारी घेऊनही केळीच्या खोडाची पाने करपली आहेत. साधारणपणे होळी पासून वादळी वारे आणि सोसाट्याचा वर सुटतो त्यात नवीन लागवडीच्या ७ ते ११ महिने कालावधीच्या केळीची पाने कोवळी, हिरवीगार असूनही बारीक धारा घेत चिरली जातात आणि त्यावर उन्हाचा परिणाम होऊन काठाने त्या कोरड्या पडू लागतात. कंगव्याच्या दात्यांसारखी झालेली ही केळी बागेची अवस्था बऱ्याचदा बाग मालकाला अस्वस्थ करून जाते.

Banana leaves torn by wind
Jalgaon Banana News : रोज साडेतीनशे ट्रक केळी उत्तरेत; तरीही व्यापारी म्हणतात उठाव नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.