जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऐन सणासुदीत पीएम किसान सन्मान योजनेचा १८वा हप्ता मिळणार आहे. जिल्ह्यात सव्वाचार लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शनिवारी (ता.५) पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना दसरा दिवाळीपूर्वीची भेट असून, मोठा दिलासा मिळणार आहे. ( Dussehra Diwali gift to 74 lakh farmers of district distributed eighteenth installment of PM Kisan yojana )
पीएम किसान योजनेच्या साईटवर अगोदरच हा हप्ता कधी जमा होणार, हे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार हा हप्ता जमा झाला आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर व सणासुदीत हा हप्ता मदतीला येईल. पीएम किसान योजनेतंर्गत आतापर्यंत एकूण १७ हप्ते जमा करण्यात आले आहेत. या योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत केंद्र शासनाने ३४ हजार रुपये दिले आहेत. या योजनेत केंद्र सरकारतर्फे प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे प्रत्येकी तीन हप्त्यांतून वर्षाला सहा हजार रुपयांची मदत देण्यात येते.
राज्य सरकारकडूनदेखील पीएम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी सहा हजार रूपये जमा करण्यात येत असून, आतापर्यंत चार हप्त्याचे आठ हजार रूपये जमा झाले आहेत. पीएम किसान सन्मान योजनेसोबतच राज्य सरकारच्या नमो महासन्मान योजनेचादेखील पाचव्या हप्त्याचा लवकरच लाभ जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दसरा दिवाळीच्या तोंडावर बऱ्याच प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे. (latest marathi news)
जिल्ह्यात आठ लाख हेक्टरापेक्षा अधिक कृषी क्षेत्र असून, सात लाख ५० हजार हेक्टर पेरणीलायक क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे सहा लाख शेतकरी आठ ‘अ’नुसार खातेदार शेतकरी असून, आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १३ हजार करपात्र उत्पन्न असलेले शेतकरी आढळून आले होते. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाकडे या शेतकऱ्यांकडून सुमारे सहा कोटींहून अधिक रकमेचा परतावादेखील करण्यात आला आहे.
''अल्पभूधारक व कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना आधार, मोबाईल, जमीनीचा खाते उतारा, बँक खाते पासबुकसह ज्या शेतकऱ्यांचे आधार ई-केवायसी नोंदणीप्रक्रिया पूर्ण झाली असेल, अशा लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तरच खात्यात पीएम किसान योजनेचा लाभ जमा होईल.''- कुरबान तडवी, जिल्हा कृषी अधीक्षक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.