पारोळा : महिन्यापूर्वी शंभर रुपये किलो दराने मिळणारे सोयाबीन खाद्यतेल आता १२० ते १२५ रुपये किलो दराने मिळत आहे. स्वयंपाकासाठी दैनंदिन वापरात लागणाऱ्या खाद्यतेलाचे भाव वाढत असल्याने गृहिणींचा हिरमोड झाला आहे. केंद्र सरकारने तेलावरील ‘एक्साईज ड्युटी’च्या वाढवल्यामुळे ही दरवाढ झाल्याने सरकारवर खुश असलेली ‘लाडकी बहीण’ आता रुसली असल्याचे बोलले जात आहे. ( edible oil price increase of Rs 20 in month )