Jalgaon News : एकगाव बारा भानगडीवर ‘डायल 112’चा प्रभावी उपाय; ‘लोकेशन’वर तत्काळ मदत

Jalgaon News : महिला- मुलींच्या छेडछाडीप्रसंगी तत्काळ मदत हवी असल्यास पूर्वी 'एक-शून्य-शून्य' असणारा हेल्पलाइन नंबर आता ११२ झाला आहे.
Helpline number 112
Helpline number 112esakal
Updated on

जळगाव : शहरासह जिल्ह्यात कोठेही दुर्घटना घडली, महिला- मुलींच्या छेडछाडीप्रसंगी तत्काळ मदत हवी असल्यास पूर्वी 'एक-शून्य-शून्य' असणारा हेल्पलाइन नंबर आता ११२ झाला आहे. पूर्वीचा डायल १०० हा मॅन्युअली त्या-त्या जिल्‍ह्यातील नियंत्रण कक्षातून हाताळला जात होता. आता ११२ थेट सॅटेलाईट कनेक्टिव्हीटीने जोडला गेला असल्याने मदत मागणाऱ्या व्यक्तीचे जीपीएस लोकेशन (पीन पॉइंट) वर मदत पेाहोचवली जाते. परिणामी, फेक कॉल्सची संख्या नगण्य असून, खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येते. (Effective solution of Dial 112 for women safety )

मराठीतील प्रचलित म्हण 'एक गाव बारा भानगडी' प्रमाणे एकशेबारा हेल्पलाइन आपल्या सेवेत बारा महिने चोविस तास अविरत कार्यरत आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील परिघात कुठलीही आपत्ती, अपघात, दुर्घटना प्रसंगी मदत अपेक्षित असणाऱ्यांना हेल्पलाइन ‘डायल क्रमांक ११२’ राज्य शासनाने कार्यान्वित केला आहे.

नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास ११२ हा हेल्पलाइन क्रमांक डायल करावा. अत्याधुनिक संगणकीय प्रणालीद्वारे संपर्क केल्यास अवघ्या काही मिनिटांत मदतीचा फोन कोठून आला, हे संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना कळते. त्यानंतर तेथील पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाईन, चाइल्ड हेल्पलाईन यांना कॉलची माहिती दिली जाते.

पंधरा हजारांवर कॉल

जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात डायल-११२ वर जिल्ह्यातून १५ हजार ३७९ कॉल प्राप्त झाले आहेत. नियंत्रण कक्षाला संपर्क झाल्याबरेाबर संबंधित पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मोबाईल व्हॅनच्या (पोलिस गाडी) ला माहिती देऊन मदत रवाना करण्यात आली आहे. (latest marathi news)

Helpline number 112
Jalgaon News : भवरखेडेतील तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू; 6 तासांनंतर मृतदेह काढला बाहेर

कोणत्या प्रकारच्या मदतीसाठी संपर्क

- आग : ८४

- लहान मुलांबाबत : २९९

- अपघात : ५३३

- ज्येष्ठ नागरिकांबाबत : ७४०

- चोरीबाबत : ६८६

- महिलेबाबत : ३,९६१

- इतर : ९,०७६

प्राण्यांबाबतही कॉल

हेल्पलाईनच्या डायल ११२ वर बेपत्ता असणे, दंगल, कोणी त्रास देत असल्यास, वेगवेगळी चौकशी, बेवारस मृतदेह आढळल्यास, तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यावर, वेगवेगळ्या घटनांविषयी देखील संपर्क करण्यात आला आहे. त्या-त्या माहितीनुसार त्याविषयी संबंधित पोलिस ठाण्यांना कळवण्यात येऊन मदतीसाठी माहिती दिली जाते.

प्रत्येक कॉलची दखल

‘डायल ११२’वर कॉल आल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याला माहिती दिल्यानंतर पोलिस संबंधित ठिकाणी पोहचतात. त्यात बऱ्याच वेळा मारामारीचे प्रसंग तक्रारदाराने केले होते. वाद घालत होते, आता ते निघून गेले, असेही प्रकार समोर येतात. जेवढे कॉल आले त्या प्रत्येक ठिकाणी पोलिसांना पोहोचणे अनिवार्य असल्याने पोलिस मदत जीपीएस लोकेशननुसार पोहोचविलीच जाते.

प्रतिक्रियांचीही नोंद

ज्याने कुणी मदतीसाठी संपर्क केला असेल, त्याला ‘डायल-११२’ नियंत्रण कक्षाकडून मदत पोहोचली की नाही, किती वेळात पेालिस आले, याची माहिती घेतली जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा संपर्क करून तुम्हाला मदत मिळाली, तुम्ही समाधानी आहात काय, आणखी कशा पद्धतीने मदत अपेक्षित होती, अशा प्रतिक्रिया देखील नोंदविल्या जातात.

Helpline number 112
Jalgaon News : कळमसरेत मुलींकडून पित्याला अग्निडाग; जागतिक कन्या दिनीच तिघी मुली झाल्या खांदेकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()