यावल : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. मात्र भाजपमध्ये अधिकृत प्रवेशाबाबत अद्याप तारीख निश्चीत नसली तरी त्यांनी आपण भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे.(Jalgaon Lok Sabha Election)
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारात उतरलो असल्याचे स्पष्ट केले. श्री. खडसे काही दिवसांपासून स्नुषा रक्षा खडसेंच्या प्रचाराच्या मैदानात थेट उतरले आहेत. मंगळवारी (ता. ३०) त्यांनी यावल येथील भाजप प्रचार कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांना सूचना देत प्रचाराचा आढावा घेतला.
भाजपत प्रवेश करीत असल्याचे आमदार खडसे यांनी जाहीर केले. मात्र लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अद्यापही त्यांचा अधिकृत प्रवेश झालेला नाही. शिवाय ते प्रचारात सक्रिय झाले नव्हते. मात्र तीन-चार दिवसांपासून ते प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसत आहे. यावल तालुक्याच्या दौऱ्यात त्यांनी प्रचारात सहभागी होत असल्याचे स्पष्ट केले. (Latest Marathi News)
भाजपतील वरिष्ठ नेत्यांकडे पक्षातील प्रवेशाबाबत मी सूचित केले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रवेशासंदर्भात विचारणा केली. त्यावर त्यांनी प्रवेशाची तारीख कळवणार असल्याचे सांगून तुमचा प्रवेश झालेलाच आहे, बैठका घेण्यास व प्रचार करण्यास हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यानुसार मी दोन दिवसांपासून प्रचारात सक्रिय झालो असून, यावल हे प्रचारातील आठवे गाव आहे. निवडणुकीत रक्षा खडसेंना किती मताधिक्य मिळेल? असा प्रश्न विचारला असता खडसे म्हणाले, की मताधिक्य किती मिळेल, यापेक्षा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
मतदानाच्या प्रमाणावरही मताधिक्य अवलंबून असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता रक्षा खडसे प्रचंड बहुमताने निवडून येतील, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी महायुतीतील घटक पक्षातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.