Eknath Khadse News : प्रकृतीमुळे मी लढणार नसल्याचे पवारांनी आधीच जाहीर केलेय; एकनाथ खडसे खडसेंची माहिती

Eknath Khadse : माझ्या प्रकृतीबाबत तीन महिन्यांपूर्वी केलेल्या तपासणीचा अहवाल आपण नेते शरद पवारांना दिला आहे.
Eknath Khadse
Eknath Khadse esakal
Updated on

Eknath Khadse News : माझ्या प्रकृतीबाबत तीन महिन्यांपूर्वी केलेल्या तपासणीचा अहवाल आपण नेते शरद पवारांना दिला आहे. त्यांनी २ डिसेंबरलाच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण निवडणूक लढविणार नसल्याचे पक्षाच्या बैठकीत सांगितले होते, त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्याचे सतीश पाटलांचे वक्तव्य गैरसमजातून आहे, अशी भूमिका माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी मांडली. (jalgaon Eknath Khadse statement on Pawar has already announced that he will not fight due to health marathi news )

माजी मंत्री सतीश पाटलांनी शनिवारी (ता. १६) याबाबत वक्तव्य केले होते. रविवारी (ता. १७) खडसेंनी त्यांच्या जळगावातील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की दिवाळीच्या दरम्यान मला हृदयविकाराचा त्रास झाल्याने तेव्हापासून मी लोकसभा निवडणुकीबाबत डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घेईन, असे सांगत आहे. पवारसाहेबांनाही डिसेंबरमध्ये केलेल्या तपासणीचा अहवाल दिला.

त्यांनीही तेव्हाच, यासंदर्भात माझी भूमिका मांडली. सतीश पाटील आमचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक आहेत. त्यांनी यासंबंधी बोलण्याआधी माझ्याशी चर्चा केली असती तर त्यांचा गैरसमज झाला नसता. मी पवारसाहेबांना उत्तरदायी आहे, त्यामुळे मी का लढत नाही, हे विचारण्याचा अधिकार इतरांना नाही, असेही खडसे म्हणाले. (latest marathi news)

Eknath Khadse
Eknath Khadse News : सीएमव्हीग्रस्तांना आठवडाभरात भरपाई द्यावी; एकनाथ खडसेंची मुख्यमंत्री कृषिमंत्र्यांकडे मागणी

‘एवढा मोठा माणूस नाही’

अजित पवार वेगळे झाले, तेव्हा मी शरद पवारांबरोबर प्रामाणिकपणे राहिलो. मी शरद पवारांच्या आमदारांच्या भरवशावर निवडून आलोय. त्यामुळे याबाबत संजय पवार काय म्हणतात, त्यासंबंधी बोलायचे नाही. त्यांच्यावर बोलू एवढा तो मोठा माणूस नाही, असा टोला खडसेंनी लगावला.

लवकरच सक्षम उमेदवार देऊ

रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत खडसे म्हणाले, की शनिवारपर्यंत आमच्या या विषयावर बैठका झाल्या. त्यात काही नवीन नावे पुढे आली आहेत. रावेर मतदारसंघात मजबूत उमेदवार दिसतील.

आर्थिक बाजू मजबूत आणि राजकारणाचा अनुभव असलेले उमेदवार निवडणूक लढवतील. एक-दोन उमेदवार वगळता राजकीय वारसा असलेले उमेदवार असणार आहेत. सध्या माजी आमदार संतोष चौधरी, कंत्राटदार विनोद सोनवणे, रवींद्र पाटील यांची नावे चर्चेत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Eknath Khadse
Eknath Khadse News : केळीवरील ‘सीएमव्ही’च्या मुद्द्यावर खडसे आक्रमक; विधान परिषदेत तारांकित प्रश्‍न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()