Inspirational News : कैरी व्यवसायातून शेकडो महिलांना रोजगार; महाजन कुटुंबीयांकडून स्वयंरोजगारासाठी प्रेरणा

Inspirational News : उन्हाळ्यात शेतीची फारशी कामे नसतात. अशा वेळी ग्रामीण भागातील महिलांसमोर रोजगाराचा प्रश्‍न निर्माण होतो.
Women laborers in peeling and slicing kairi.
Women laborers in peeling and slicing kairi.esakal
Updated on

Inspirational News : उन्हाळ्यात शेतीची फारशी कामे नसतात. अशा वेळी ग्रामीण भागातील महिलांसमोर रोजगाराचा प्रश्‍न निर्माण होतो. काम नसल्यामुळे अनेकदा कुटुंबाचीही आबाळ होते. परंतु शहरात कैरीच्या पूरक व्यवसायातून शेकडो महिलांना रोजगार मिळाला आहे. कैरीचे तुकडे करणे, छिलणे हा हंगामी व्यवसाय येथील महाजन कुटुंबीयांच्या माध्यमातून गेल्या १६ ते १७ वर्षांपासून महिलांना उपलब्ध होत असतो. (Employment of hundreds of women through mango business )

शहरात कोणतीही औद्योगिक वसाहत नसल्यामुळे अनेक युवक हे विविध दुकानांवर काम करून कुटुंबाला आधार देत आहे. त्याचप्रमाणे शेतीसह कापड, मेडिकल, माॅल हे सोडले तर महिलांसाठी कोणताही रोजगार नाही. त्यामुळे कुटुंबाला हातभार लागावा व त्यातून कुटुंबाची उन्नती व्हावी, यासाठी महिला देखील सहभागी होतात. दरम्यान, फक्त चार महिने महिलांना शेतीची कामे असतात.

मात्र उन्हाळ्यात हाताला काम नसल्यामुळे शहरातील आधार महाजन व अर्जुन महाजन या कुटुंबाने कैरी व्यवसायातून तब्बल १०० महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. गेल्या १६ ते १७ वर्षापासून आधार महाजन व अर्जुन महाजन हे कैरी व्यवसाय करीत आहेत. तोतापुरी कैरी ही आंध्र प्रदेश येथून आणत महिलांकडून कैरीस छिलून कच्चा माल तयार करून तो अहमदाबाद, बडोदा, नाशिक येथे पाठविला जातो.

दरम्यान, या व्यवसायामुळे शहरातील तब्बल १०० गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाल्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी शहरात औद्योगिक वसाहत आणून सुशिक्षित बेरोजगार युवकांसह महिलांना देखील रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरून राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पारोळा शहराचा लौकिक वाढेल. (latest marathi news)

Women laborers in peeling and slicing kairi.
Inspirational News : अवघ्या दोन पाण्याच्या बाटल्यांवर गाठला ‘एवरेस्ट’चा बेस कँम्प; अंगणवाडी सेविकेच्या मुलीची कामगिरी

शहरातील दोन ठिकाणी कैरी व्यवसाय

महिलांची स्वयंरोजगारासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी आधार महाजन व अर्जुन महाजन यांनी राजीव गांधीनगर व मोठा महादेव चौक या दोन ठिकाणी व्यवसायाला सुरवात केली आहे. त्यामुळे स्थानिक महिलांना या व्यवसायाच्या माध्यमातून दैनंदिन चारशे ते पाचशे रुपये रोजगार उपलब्ध झाला आहे.

''गेल्या १६ ते १७ वर्षांपासून आमच्या दोन्ही भावांचे कुटुंब या व्यवसायात आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगार मिळाल्याचे समाधान आहे.''- अर्जून महाजन, व्यावसायिक, पारोळा

''येथे काम करणाऱ्या सर्वच महिलांची कौटुंबिक परिस्थिती साधारण आहे. त्यामुळे कैरीचे काप करणे, छिलणे या हंगामी व्यवसायातून आम्हाला दोन पैसे मिळतात. कुटुंबालाही हातभार लागतो.''- ललिता पाटील, महिला रोजगार, पारोळा

Women laborers in peeling and slicing kairi.
Inspirational News : नंदाताई राजपूत बनल्या महिलांच्या ‘आयडॉल’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.