Jalgaon News : भंगार खरेदीतून तरुणांना रोजगार; अनेकांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह

Jalgaon : वापरात नसलेल्या वस्तूसह लोखंड, पुठ्ठा, वह्या, पुस्तके व पेपर रद्दी खरेदीतून शहरातील अनेक तरुणांना दैनंदिन पाचशे ते सहाशे रुपये मिळत आहेत.
Young people buying scraps with old plastic in the street.
Young people buying scraps with old plastic in the street.esakal
Updated on

Jalgaon News : वापरात नसलेल्या वस्तूसह लोखंड, पुठ्ठा, वह्या, पुस्तके व पेपर रद्दी खरेदीतून शहरातील अनेक तरुणांना दैनंदिन पाचशे ते सहाशे रुपये मिळत आहेत. या व्यवसायातून अनेकांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. दरम्यान, समाजात या व्यवसायाकडे दुर्लक्षित म्हणून पाहिले जाते. दैनंदिन खरेदीतून रोजच्या घेतलेल्या वस्तू भंगार दुकानात विकून रोजंदारी कमवणे हे या व्यवसायाचे खरे स्वरूप आहे. (Employment of youth through purchase of scrap)

त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील तरुणासह नागरिक या व्यवसायाकडे वळले आहेत. शहरात पाच ते सहा दुकाने भंगार खरेदीची आहेत. लोखंड, पुठ्ठा, रंगीत व काळे प्लॅस्टिक, ठिबक नळ्या, वह्या-पुस्तके, पेपर रद्दी आदी वस्तू खरेदीदारांकडून घेतल्या जातात. बरेचसे भंगार खरेदीधारक शहरात हातगाडीवर रोकड देऊन व्यवसाय करतात, तर काही स्टील भांडे देऊन शहरी भागासह ग्रामीण भागात भंगार खरेदी करतात.

दिवसभर शहरातील गल्ल्यांमध्ये जुने भंगार विकत घेतात. ते दुकानदारांना देऊन आपली रोजंदारी कमवीत आहेत. शहरात कोणताही मोठी औद्योगिक वसाहत नसल्यामुळे येथील तरुण कुटुंबाला हातभार लागावा, यासाठी मिळेल तो रोजगार करतात. दरम्यान, तालुक्यात या व्यवसायातून हजारो रुपयांची उलाढाल होते.

खरेदीच्या आवकप्रमाणे किरकोळ विक्रत्यांना दैनंदिन रोजंदारी मिळते. काही वेळा खरेदीधारकास रोजची ८०० ते ९०० रुपये या व्यवसायाच्या माध्यमातून मिळतात. त्यामुळे अनेक तरुण या व्यवसायाकडे वळले आहेत. दुचाकी व चारचाकी दुचाकी व चारचाकी वाहनाचे टाकाऊ टायर इकडे तिकडे फेकतात. मात्रल ते टायरही भंगार बाजारात खरेदी केली जातात. (latest marathi news)

Young people buying scraps with old plastic in the street.
Jalgaon News : विनातिकीट प्रवाशांकडून साडेसात लाख दंड वसूल

भंगार व्यवसायाचे भाव

-लोखंड ३५ रुपये प्रतिकिलो

-पुठ्ठा १२ रुपये प्रतिकिलो

-रंगीत प्लॅस्टिक २० ते २५ रुपये प्रतिकिलो

-काळे प्लॅस्टिक ४ रुपये प्रतिकिलो

-ठिबक नळी ३० ते ६० रुपये प्रतिकिलो

वरील भावात चढ-उतार होत असते

''गेल्या सात ते आठ वर्षांपासून या व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाला सांभाळले आहे.''-प्रदीप पाटील, पारोळा

''शहरातील दुकानदारांकडून आलेले भंगार खरेदी करून त्याची छाननी करून ते बाहेरगावी विक्रीसाठी पाठविले जाते. भंगार व्यवसायाच्या भावात रोज चढ उतार होत असते.''-साहेबराव भोई, भंगार खरेदी व्यावसायिक

Young people buying scraps with old plastic in the street.
Jalgaon News : पाडळसरे प्रकल्पावर यंदा 136 कोटी खर्च; 13 वॉक वे ब्रीज बसविले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com