धरणगाव : शहरातील १ हजार ८७५ अतिक्रमणधारकांना लवकरच हक्काची जागा मिळणार असून, कोणीही बेघर राहणार नाही. अतिक्रमणधारकांची जागा त्यांच्या नावावर करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. पहिल्या टप्प्यात नेहरूनगरमधील १५१ अतिक्रमणधारकांना ते राहत असलेले घर त्यांच्या स्वतःच्या नावावर होण्यासाठी उपविभागीय अधिकारी, एरंडोल यांनी आदेश दिले आहेत, अशी माहिती अतिक्रमण संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. वसंतराव भोलाणे, सचिव रवींद्र कंखरे यांनी शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. (Jalgaon Encroached space in Dharangaon will be regular)
या पत्रकार परिषदेला पप्पू भावे, शिवसेनेचे शहरप्रमुख विलास महाजन, अभिजित पाटील, बुटा पाटील, संजय चौधरी, भाजपचे शिरीष बायस, कैलास माळी, हेडगेवार नगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच चंदन पाटील, दिलीप महाजन, विजय महाजन, पूनिलाल महाजन आदी उपस्थित होते. अतिक्रमणधारकांना किमान ५०० ते १५०० स्क्वेअर फूट जागा शासन मालकी हक्काने देणार आहे.
शहरातील संजयनगर, पारोळा नाका, नेहरूनगर, रामदेवजी बाबानगर, हनुमान नगर, हमालवाडा, दादाजी नगर, गौतम नगर, पोलिस लाईन आदी परिसरात सरकारी जमिनीवर शहरातील बेघर नागरिक गेल्या ३० वर्षांपासून राहत आहेत. मात्र या नागरिकांना नागरी सुविधा मिळत नव्हत्या.
स्वतः राहत असलेले घर नावावर होत नव्हते. त्यांना स्वतःचे घर देखील बांधता येत नव्हते. तसेच बँकेकडून देखील कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळत नव्हते. तसेच त्यांना प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजना आदी शासकीय योजनाचा लाभ घेता येत नव्हता. वास्तविक जे नागरिक १ जानेवारी २०११ पूर्वी जेथे राहत असतील, त्या जागा महाराष्ट्र शासनाचा ४ मार्च २०१९ च्या नियमाप्रमाणे शासकीय जागांवर अशा लोकांना अतिक्रमण केलेले असल्यास ते नियमित करून द्यावे, असे आदेश होते. (latest marathi news)
परंतु धरणगाव नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नव्हती. यासाठी २५ ऑगस्ट २०२३ ला पालिका प्रशासनाला बेघर अतिक्रमण संघर्ष समितीतर्फे अध्यक्ष ॲड. व्ही. एस. भोलाणे व सचिव रवींद्र कंखरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. निवेदन देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित होते.
त्यावेळी पालकमंत्र्यांनी एरंडोल उपविभागीय अधिकारी, धरणगाव तहसीलदार, भूमी अभिलेख, मुख्यधिकारी यांना आदेश दिले की, शासनाच्या नियमाप्रमाणे जे नागरिक १ जानेवारी २०११ किंवा तत्पूर्वी त्या जागेवर राहत असतील तर त्यांचे अतिक्रमण नियमित करण्यात यावे.
टप्प्याटप्प्याने होणार कार्यवाही
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये १८ जुलैला नेहरूनगर भागात राहत असलेल्या नागरिकांसाठी १५१ लोकांचे अतिक्रमण नियमित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शहरातील उर्वरित अतिक्रमणेही नियमित करण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच ते आदेश होतील. या निर्णयामुळे सर्व अतिक्रमणधारक आनंदोत्सव साजरा करीत असून, पालकमंत्री पाटील, अतिक्रमण संघर्ष समितीचे अध्यक्ष भोलाणे, सचिव कांखरे यांचे आभार व्यक्त करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.