आमदार चिमणराव पाटील प्रकृतीच्या कारणामुळे स्वत: निवडणूक लढविणार नाहीत. त्यांचे चिरंजिव अमोल पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार)चे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदारपुत्र व माजी पालकमंत्र्यांत लढतीची शक्यता आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मतदारसंघावर दावा केला असून, जिल्हाप्रमुख डॉ. हर्शल माने यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष अमोल पाटील, डॉ. संभाजी पाटील, भाजपतर्फे माजी खासदार ए. टी. पाटील, नाना महाजन, विजय महाजन, भगवान महाजन हेही इच्छूक आहेत. (Erandol Parola Assembly MLA son former state minister likely to compete)