अमळनेर : राज्यातील दोन लाख २१ हजार ११२ अंगणवाडीसेविका व मदतनीसांना मानधनवाढ व प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. मात्र, त्यासाठी दोन तास कामाची वेळ वाढविली आहे. किमान ११ वर्षे सेवा झालेल्यांनाच या निर्णयाचा लाभ होणार आहे. दुसरीकडे प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी त्यांना किमान ८० टक्के गुण घेणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी गुण मिळाल्यास प्रोत्साहन भत्ता मिळणार नसल्याचे निदर्शनास आले आहे. (Exam for Anganwadi Helpers for Incentive Allowance)