Jalgaon News : महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आरमार याचे प्रदर्शन जळगाव येथील इतिहास अभ्यासक महेश माधवराव पवार यांच्या माध्यमातून भरविण्यात आले आहे.
श्री. पवार यांचा मूळ व्यवसाय शेती आहे. त्यांनी आरमार उभे केले आहे. आरामारातील प्रत्येक जहाजाची प्रतिकृती आणि त्याची माहिती लावली आहे. (Jalgaon exhibition of Chhatrapati Shivaji Maharaj armor during Mahasanskruti Mahotsav)
जळगावकरांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आरमार उभारले होते. शिवरायांनी कल्याण, भिवंडी येथे जहाज उभारणीचे कार्य २४ ऑक्टोबर १६५७ ला सुरु केले.
सुरवातीला पोर्तुगीजांना त्यांनी या कामासाठी पगारी ठेवले होते. पण ते फार दिवस टिकले नाहीत तेंव्हा कोकणातील स्थानिक लोकांच्या मदतीने शिवरायांनी जहाज बांधणीचे काम पूर्ण केले अशी माहिती महेश पवार यांनी दिली. (latest marathi news)
छत्रपती शिवरायांनी आरमारात छोट्या जहाजांवर जास्त भर देत मचवा, शिबाड, पाल, गुराब, गलबत, पाटीमार इ. प्रकारची जहाजे बनवून घेतली होती त्या सर्वांच्या प्रतिकृती तसेच चोल साम्राज्याच्या जहाजांच्या प्रतिकृती.
इंग्रज व पोर्तुगीजांचे जहाज आणि आय.एन.एस विक्रांत यांच्या प्रतिकृती व त्यांचा इतिहास या प्रदर्शनात दाखवला आहे. पोलिस कवायत मैदानावर हे प्रदर्शन ३ मार्चपर्यंत असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.