Jalgaon News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सोयाबीन, उडीद, मूग, मका आदी शेतीमालास हमीभाव मिळत नसल्याची स्थिती आहे. दर्जेदार शेतीमालासही कवडीमोल दर दिला जात आहे. त्यात लिलावाचा सोपस्कार पार पाडून अडतदार शेतीमाल थेट आपल्या दुकानात साठवितात.
शेतकरी मोजमाप किंवा तोलाईची मागणी करतात, पण त्यांना खरेदीदारांना वेळ नाही, दोन दिवस थांबा असे सांगून परत पाठविले जाते. यात शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचेही सांगितले जात आहे. (Market Committee farmers do not get payment even within week)