Jalgaon Extortion Crime : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 15 लाखांची खंडणी

Extortion Crime : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेस गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव ते एरंडोल असा पाठलाग करत अटक केली.
Extortion Crime
Extortion Crimeesakal
Updated on

Jalgaon Extortion Crime : जेवणात गुंगीचे औषध देऊन एका पेट्रोलपंपचालकाचे अश्‍लील फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेस गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव ते एरंडोल असा पाठलाग करत अटक केली. पेट्रोलपंपचालकाची डेटिंग ॲपवर महिलेशी ओळख झाली. त्या महिलेने आपण सीआयडीसी ऑफिसर असून, पती रेल्वेत टीसी असल्याचा बनाव केला. माझे पती दोन वर्षांपासून शारिरीक संबंध ठेवत नसल्याची खोटी कथा सांगितली. (Extortion of 15 lakhs by threatening to spread obscene photos viral )

नंतर ती महिला ७ मार्चला धुळ्यात भेटली. पेट्रोलपंपचालकाला जेवणात गुंगीचे औषध मिसळून त्यांना एका फ्लॅटवर घेऊन गेली. तेथे त्याच्यासोबत अश्‍लिल फोटो काढून तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. नंतर ‘तु माझ्यासोबत अशीच रिलेशनशीप सुरू ठेव. नाही तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल’ अशी धमकी दिली. थोड्या दिवसांनी ‘मी तुझ्यापासून प्रेग्नंट राहिलयं’, असे खोटे सांगून त्या महिलेने व्यावसायिकाकडून तीन लाखांची खंडणी उकळली.

१५ लाखांसाठी घरावर धडक

नंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १५ लाखांची मागणी केली. पैसे देत नाही, म्हणून त्या व्यावसायिकाच्या घरात धिंगाणा घातला. व्यावसायिकासह त्यांच्या पत्नीला लोखंडी सळईने मारहाण केली व दहा ग्रॅमची चैन व त्यांच्या पत्नीचे ३० ग्रॅमचे मंगळसूत्र जबरीने हिसकावले. शेजारच्यांनी दांपत्याला त्या महिलेच्या तावडीतून सोडवून खासगी रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी (ता. ९) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर व्यावसायिकाने महिला पदाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांची भेट घेतली.

Extortion Crime
Jalgaon Fraud Crime : ट्रेडींगच्या नावाखाली 13 लाखांना गंडा

पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन अव्हाड यांच्या पथकाने शोध सुरू केला. मूळची मुक्ताईनगर येथील असणारी ती महिला सध्या रिंग रोडवरील कृष्णा अपार्टमेंटमध्ये भाड्याने फ्लॅटमध्ये वास्तव्याला होती. पोलिस गाडी गेटवर आल्यावर त्या महिलेने रिक्षा बोलावली. पहिल्या मजल्यावरून उडी घेत रिक्षातून पसार झाली.

ती पसार झाल्याचे कळताच राष्ट्रीय महामार्गावरून तिचा शोध सुरू झाला. दुचाकीवरील गुन्हे शाखेच्या पोलिसाने महिलेची रिक्षा एंरडोलपुढे अडवली. चालकाला लायसन्स, कागदपत्रे विचारत असतानाच, ‘ओ दादा तुम्हाला काय हवयं ते, घ्या अन्‌ सोडा’, असे आमिष त्या महिलेने दिले. काही वेळातच महिला पोलिस अधिकाऱ्यांसह पथक धडकले व तिला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यावर तिला ७ दिवसांच्या पोलिस कोठडीत रवाना केले.

Extortion Crime
Jalgaon Fraud Crime : पतीच्या निधनानंतर विमा पॉलिसीचे 11 लाख हडप करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.