Jalgaon News : घुमावल बुद्रूक येथे अल्पवयीन मुलाची मानसिक त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon : जीवे मारण्याच्या धमकीमुळे तालुक्यातील घुमावल बुद्रूक येथील रहिवासी मंगेश रेवानंद पाटील या सतरावर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
mangesh patil
mangesh patil esakal
Updated on

Jalgaon News : पूर्ववैमनस्यातून वारंवार दिल्या जाणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून व जीवे मारण्याच्या धमकीमुळे तालुक्यातील घुमावल बुद्रूक येथील रहिवासी मंगेश रेवानंद पाटील या सतरावर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता.१६) सकाळी सहा ते साडेसहाच्यादरम्यान घडली. मंगेशचे काका वसंत प्रेमराज पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिसांत महेंद्र एकनाथ पाटील (वय ३८), मनोज पंढरीनाथ पाटील (वय ४२) व पवन मगन पाटील (वय २९, सर्व रा. घुमावल बुद्रूक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. (extreme step taken by minor boy due to his mental suffering)

आत्महत्या करण्यापूर्वी मंगेशने चिट्ठी लिहून त्रास देणाऱ्या व्यक्ती बाबत खुलासा केला आहे. मंगेशचे काका वसंत पाटील यांनी २०१८मध्ये संरपंचपदाची निवडणुक लढविली. त्यात संशयिताचे काका सदाशिव दंगल पाटीलविरोधात फक्त १८ मतांनी ते विजयी झाले. तेव्हापासून त्यांच्या मनात राग होता. शिवाय मंगेश हा महेंद्र पाटीलच्या मुलीशी शाळेच्या बसस्टॉपवर बोलत असताना महेंद्र एकनाथ पाटील यांनी पाहिले असता यास वाईट वाटले.

mangesh patil
Jalgaon News : चोपडा तालुक्यात अनेक शाळांच्या खोल्या धोकादायक; मान्यताअभावी कामे रखडली

त्याचा दुराग्रह करून तिन्ही आरोपींनी मंगेशला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत जीवे ठार मारण्याचो धमकी दिली, तर ११ जूनला सकाळी नऊच्या सुमारास मंगेश चोपड्याकडे जात असताना महेंद्र पाटीलने मंगेशला धमकी देत दुचाकी अंगावर नेत शिवीगाळ केली. या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून मंगेशने आज रविवारी जीवन संपविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एकुलत्या एक मंगेशच्या जाण्याने घुमावल गावात शोककळा पसरली. मंगेशवर संध्याकाळी पाचच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगेशने मृत्यूपूर्वी लिहिलीली चिठ्ठी पोलिसांकडे

मंगेशने मृत्यूपूर्वी स्वःताच्या हस्ताक्षरात रजिस्टरच्या पानावर लाल शाईने इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी खोलीतील ड्रेसिंग टेबलावर पोलिसांना मिळाली. ‘पप्पा आजपर्यंत मी जितक्या पण चुका केल्या असतील, त्यांच्यासाठी माफी मागतो. सर्वांची हात जोडून माफी मागतो. मी हा निर्णय घ्यायला नको होता. पण मला आता रहायचं नाही. माझ्याने आता सहन होत नाही. त्याने मला मारण्याची धमकी दिली आहे. मी फाशी लावून जीव देतो, पण मला त्याच्या हातून मरायच नाही’, असा आशय चिठ्ठीत असून, ती पोलिसांना मिळाली.

mangesh patil
Jalgaon News : निंबोळ्या काढण्याचा हंगाम सुरू; वडनेच्या शेतकऱ्याचाही समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com