भुसावळ : भुसावळच्या मध्य रेल्वे विभागात डिजिटल पद्धतींचा वापर करून कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन मिळणार आहे. प्रवाशांना सुलभ व अधिक कार्यक्षम सेवा सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे प्रशासन सतत प्रयत्न करीत आहे. कॅशलेस व्यवहारांच्या दिशेने जाताना भुसावळ विभागातील सर्व आरक्षण कार्यालये व अनारक्षित बुकिंग कार्यालयाच्या सर्व काउंटरवर क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Facility of QR code on railway ticket windows Bhusawal section)