फैजपूर : फैजपूर पालिकेने कर वसुलीसाठी थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून पालिकेचे नाव लावण्याची व नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई सुरु केली आहे. दरम्यान करवसुली जोरात सुरु असली तरी अजून पन्नास टक्के करवसुली बाकी असून मार्च एंडला आठवडाच बाकी आहे. त्यामुळे आठवड्यात ५० टक्के वसुलीचे आव्हान आहे. (Jalgaon Faizpur Municipality challenges of fifty percent tax collection in week)
कोरोना लॉकडाऊन मुळे पालिकेच्या वित्तीय वर्ष २०१९-२० व २०२०-२१ या वित्तीय वर्षांची घरपट्टी व पाणी पट्टी कराची वसुलीला मोठा फटका बसला होता. फैजपूर शहरातील घर मालमत्ताधारक ६ हजार २०० तर नळधारक ५ हजार २०० इतकी संख्या आहे. पालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी करात वाढच केलेली नसली तरी, थकबाकीदार नळधारक व मालमत्ताधारक तसेच गाळेधारकांनी कराचा भरणा केलेला नाही.
३०० थकबाकीदार नळधारक व मालमत्ता धारकांना जप्ती वॉरंट नोटिसा तर २०० थकबाकीदार गाळेधारकांना कराची थकबाकी त्वरित जमा करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. तरीही कर वसुलीचा टक्का वाढता वाढत नाही. म्हणून थकीत कर न भरणाऱ्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून पालिकेचे नाव लावण्याची व नळ बंद तसेच गाळे धारकांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू केली आहे.
आठवड्यात ५० टक्के
कर वसुलीला प्रतिसाद मिळत नसल्याने २०० गाळेधारकांना गाळे सील करण्याच्या नोटिसा पालिकेने दिलेल्या आहेत. १५ मार्चपर्यंत थकबाकीसह चालू वर्षांची घरपट्टी कराची एकूण मागणी रक्कम १ कोटी ५६ लाख ४ हजार मागणी पैकी ७७ लाख ५१ हजार (४९.६८) टक्के कर वसूल झाले आहे. (latest marathi news)
तर पाणीपट्टी कराची थकबाकीसह चालू वर्षांची एकूण मागणी रक्कम १ कोटी २८ लाख ५६ हजार पैकी ५४ लाख ८३ हजार (४२.६५) कर वसूल झाले आहे.अशी पालिकेची एकूण पन्नास टक्के कर वसुली झाली आहे.
"कर वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरी जाऊन कर वसुलीची मोहीम राबविण्यात येत आहे. तत्काळ कर रकमेचा भरणा न केल्यास थकबाकीदारांची स्थावर जंगम मालमत्ता अटकाव करण्यात येईल नळ बंद करण्याची कारवाई सुरू झाली आहे. मालमत्तांना पालिकेचे नाव लावले जाणार आहे." -बाजीराव नवले, कर निरीक्षक फैजपूर पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.