दहिगाव (ता. यावल) : आजच्या काळात प्रामाणिकपणा संपल्याची ओरड होत असते. परंतु अशा काळातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याच्या काही सुखद घटना समोर येतात. अशीच एक आश्चर्यकारक पण तितकीच रंजक घटना दहिगावात समोर आली. येथील एका गरीब शेतकऱ्याने त्याच्या मुलीस देण्यासाठी आणलेले एक लाख रुपये प्रवासात गहाळ झाले. परंतु चोपड्यातील एका सद्गृहस्थाला सापडलेली पैशांची गोणी त्याने प्रामाणिकपणे परत केली. (jalgaon farmer Put 1 lakh rupees in sack of millet)
लोटन चिंधू जयकर यांची हे दहिगावात कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. ते अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यासोबत कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी पारंपरिक मोची व्यवसाय देखील करतात. त्यांच्या मुलील पैशांची गरज असल्याने लोटन जयकर यांनी कशीबशी तजवीज करून एक लाख रुपये जमा केले.
मुलीला देण्यासाठी ही रक्कम त्यांनी २५ किलो बाजरीच्या गोणीत ठेवली. गोणी घेऊन ते खिर्डी (ता. रावेर) येेथे मुलगी सुनंदा वानखेडे हिच्याकडे जाण्यासाठी यावल- फैजपूर बसने निघाले. मात्र बसमध्ये त्यांनी ठेवलेल्या जागी आणखी एक गव्हाची गोणी होती. उतरताना त्यांनी बाजरीऐवजी शेजारी असलेली गव्हाची गोणी नेली.
फैजपूर येथे गोणीची दोरी सुटल्याने आपली बाजरीची गोणी बदल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले अन् त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. ते सैरभैर झाले. ते तातडीने यावल बसस्थानकावर आले. तेथे चौकशी केली असता असे समजले की ही गोणी चोपडा गाडीमध्ये गेली. तत्काळ ते दहिगाव येथे परतले. दहिगावात चौकशी केली असता माळी कुटुंबाकडे पाहुणे म्हणून आलेल्यांकडे ही गोणी आहे. (latest marathi news)
त्या कुटुंबांचा पत्रकार ए. टी. चौधरी व जयकार कुटुंबाने शोध घेतला. चौकशी केली असता संबंधित कुटुंबाने शेतकऱ्याला धीर देत सांगितले, की गोणीसह तुमचे पैसे सुरक्षित असून, केव्हाही येऊन घेऊन जा’. त्यानंतर तत्काळ जयकर कुटुंब आणि पत्रकार चौधरी दोघे रिक्षाने चोपडा येथे रवाना झाले.
चोपडा येथील पाटील गढी भागात रघुनाथ पांडुरंग महाजन यांच्याकडे दोघे पोहोचले. यावेळी रघुनाथ महाजन यांनी प्रामाणिकपणे गोणीसह त्यातील एक लाख रुपये परत संबंधित शेतकऱ्याला परत केले.
..अन् शेतकऱ्याचे पाणावले डोळे
दरम्यान, त्यांचा हा प्रामाणिक पाहून शेतकऱ्याचे डोळे पाणावले. त्यांनी मोबदला म्हणून महाजन यांना अक्षय तृतीयेनिमित्त एक हजार रुपयांची भेट त्यांचे आभार मानले. या घडलेल्या प्रकारामुळे गाव व परिसरात महाजन कुटुंबीयांचे कौतुक होत आहे. आजही माणुसकी जिवंत असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.