PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित; अमळनेर तालुक्यातील स्थिती

Kisan Scheme : केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान योजना सुरू केली आहे. मात्र, अमळनेर तालुक्यात अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.
Farmer Narayan Patil asking Taluka Agriculture Officer Chandrakant Thackeray for answers.
Farmer Narayan Patil asking Taluka Agriculture Officer Chandrakant Thackeray for answers.esakal
Updated on

PM Kisan Scheme : केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान योजना सुरू केली आहे. मात्र, अमळनेर तालुक्यात अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केल्याची घोषणा केली. परंतु, केवायसी पूर्ण होऊनसुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे आलेच नाहीत. याबाबत गुरुवारी (ता.२०) दुपारी सात ते आठ शेतकऱ्यांनी अमळनेर कृषी कार्यालय गाठून तालुका कृषी अधिकारी यांना घेराव घातला. (Farmers are deprived of benefits of PM Kisan scheme in Amalner Taluka )

येथील कृषी कार्यालयात एका शेतकऱ्याने कृषी अधिकाऱ्यांसमोर तीव्र संताप केला आहे. गेल्या वर्षभरापासून तब्बल १८ चकरा मारूनदेखील मला पीएम किसान योजनेचा लाभ का मिळाला नाही? आपल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेली कागदपत्रे पूर्णपणे जमा केलीत. अजूनही मी त्या लाभापासून वंचित का?, याचे उत्तर मला द्यावे. शेतकरी वर्गातील कष्टकरी गरीब शेतकऱ्याचा जीवाचा तळतडा घेऊ नका साहेब! दिवसरात्र कष्ट करीत रक्ताचे पाणी करीत मूठभर शेती घेतली आहे.

त्यातदेखील पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही, तर आपण आम्हाला सांगा अजून कोणत्या अधिकाऱ्यांकडे जाऊ?, तर आपल्या या कार्यालयातून तुमच्या कर्मचाऱ्यांकडून आम्हाला उडवाउडवीचे उत्तर भेटतात. पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. शेतीची कामे सोडून या ठिकाणी येऊन खेटत असतो. तीव्र संताप व्यक्त करीत या कृषी कार्यालयातच आत्महत्या करेल, असा इशाराही शेतकरी नारायण दिगंबर पाटील यांनी दिला आहे. (latest marathi news)

Farmer Narayan Patil asking Taluka Agriculture Officer Chandrakant Thackeray for answers.
PM Kisan Scheme: हजारावर शेतकऱ्यांचे ‘लँड सिडिंग’ रखडले, पीएम किसानच्या लाभासाठी पूर्तता आवश्यक, ई-केवायसी असणं आवश्यक

योग्य मार्गदर्शनाचा अभाव

शेतकऱ्यांना बँक कर्मचारी, तलाठी, कृषी सहायक हे योग्य मार्गदर्शन न करता उडावाउडवीची उत्तरे देतात. पर्यायाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होत नाही. शेतकरी लागवड व पेरणी आदी कामांच्या दिवसात शासकीय कार्यालयात हेलपाटे मारून थकत आहेत. कागदोपत्रांची पूर्तता करूनही लाभ मिळत नाही. प्रशासन शेतकऱ्याची थट्टा करीत आहे की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपयांचा लाभ मिळतो. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा आहे, अशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळतो आहे. परंतु, सातबारा नावावर असूनसुद्धा अनेक शेतकरी या लाभापासून वंचित आहेत. याबाबत शेतकऱ्यांकडून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.

''डिऍक्टिव्ह प्रकरण आपण ॲक्टिव्ह करण्यासाठी पाठवली आहेत. राज्यस्तरावरून ऍक्टिव्ह होतात. जिल्ह्यावरून पुण्याला पाठवलेले आहेत. वर्षभरापासून १,४०० शेतकऱ्यांचे प्रकरणे पाठवलेले आहेत. काही शेतकऱ्यांचे प्रकरणे झालेली आहेत.''- चंद्रकांत ठाकरे, तालुका कृषी अधिकारी, अमळनेर.

Farmer Narayan Patil asking Taluka Agriculture Officer Chandrakant Thackeray for answers.
PM KISAN Scheme: साडे आठ हजार शेतकऱ्याची ई-केवायसी व आधार संलग्नीकरण बाकी, सन्मान निधीच्या लाभासाठी पूर्तता आवश्यक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.